पिता-पुत्राची 10 वर्षांनंतर गळाभेट

04 Jun 2023 18:39:42
रामगढ, 
लहानपणी आईपासून दुरावलेला (Father-son reunion) मुलगा किंवा मुलगी, पिता-पुत्र, दोन भाऊ, बहीण-भाऊ यांची एखाद्या जत्रेत ताटातूट होऊन खूप वर्षांनंतर ते एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने राहतात, अशा कथा आपण चित्रपटात नेहमीच पाहतो. पण प्रत्यक्षात असे घडले असेल तर त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहत नाही. अशीच घटना झारखंड येथे घडली आणि 10 वर्षांपासून दुरावलेल्या पिता-पुत्रांची भेट झाली. टिंकू वर्मा आणि शिवम वर्मा असे पिता-पुत्राचे नाव आहे.
 
Father-son reunion
 
2013 मध्ये पत्नीच्या गूढ मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी पिता टिंकू वर्माला अटक केली होती. (Father-son reunion) कारागृहातून सुटका झाल्यानंतर टिंकू वर्मा उदरनिर्वाहासाठी ऑटो चालवू लागले. पण कारागृहात असताना त्यांचा मुलगा शिवम सामाजिक संस्थेच्या मदतीने शिकत होता. पण काही दिवसांपूर्वी त्यांची एका भोजनदान कार्यक्रमात भेट झाली आणि दोघांनीही एकमेकांना ओळखल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.
 
 
शुक्रवारी दुपारी गरिबांसाठी भोजनदान कार्यक्रमात टिंकू वर्मा बसले होते. (Father-son reunion) योगायोगाने त्यांचा मुलगा शिवम भोजन वितरित करीत होता. त्यावेळी मुलाने वडिलांना पाहिले आणि दाढीवाला चेहरा आपल्या वडिलांसारखा दिसतो, असे जाणवले. वडिलांनीदेखील शिवमला ओळखले. टिंकू वर्माच्या अटकेनंतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्याला दैवी ओंकार मिशन या संस्थेच्या स्वाधीन केले होते. पिता-पुत्राची भेट होताच दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. या भावनिक प्रसंगाने संस्थेचे व्यवस्थापक राजेश नेगी यांचे लक्ष वेधून घेतले.
 
 
नेगी म्हणाले की, आईच्या मृत्यूनंतर त्याच्या (Father-son reunion) वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांनी शिवमला संस्थेकडे दिले होते. शिवम आता आठवीत आहे. तो अनेकदा संस्थेच्या भोजन वितरण सेवेत भाग घेतो. त्यामुळे त्याला एका दशकानंतर त्याच्या वडिलांना भेटण्यास मदत झाली.
 
 
राजेश नेगी यांनी सांगितले की, सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर शिवमला त्याच्या (Father-son reunion) वडिलांच्या स्वाधीन करण्यात येईल. शिवम म्हणाला की, आयुष्यात मी माझ्या वडिलांना पुन्हा भेटेन, असे मला कधीच वाटले नव्हते. त्यांना भेटणे माझ्यासाठी दैवी देणगीपेक्षा कमी नाही. पण ज्या दैवी ओंकार मिशनमध्ये मी बालपण घालवले त्यापासून वंचित होईल. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मुलाची काळजी घेतल्याबद्दल टिंकू वर्मा यांनी संस्थेचे आभार मानले.
Powered By Sangraha 9.0