मोठा निर्णय ! रातुम नागपूर विद्यापीठात एनईपी-२०२० लागू !

05 Jun 2023 19:58:16
नागपूर,
NEP-2020 in RTMNU नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० वर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० (NEP-2020) लागू करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय विद्वत परिषदेने घेतला आहे. माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ५ जून रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. NEP-2020 in RTMNU महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० हे २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचे निर्देश सरकारने २० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णय नुसार दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता निर्माण व्हावी या अनुषंगाने विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमाची रचना सर्व विद्याशाखा मधील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी करण्यात आली आहे. NEP-2020 in RTMNU
 
 

rtmnu 
 
 
 
NEP-2020 in RTMNU ह्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे मेजर -मायनर ह्या विषयांची निवड करता येणार आहे. या व्यतिरिक्त कौशल्य आधारित अभ्यासक्रम, क्षमतावर्धन अभ्यासक्रम सोबतच सहअभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे असे विविधाअंगी निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व विद्या शाखां अंतर्गत येणाऱ्या समान स्वरूप विषयांचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता यावे अशी शासनाची अपेक्षा आहे. NEP-2020 in RTMNU विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा आदी चार विद्याशाखांनी अंतर्गत येणाऱ्या अभ्यास मंडळाच्या सहकार्याने नवीन अभ्यासक्रमांची संरचना तयार केली आहे. NEP-2020 in RTMNU नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यास मंडळाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले.
 
दोन महिने सातत्याने परिश्रम घेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम परीक्षा योजना अभ्यास मंडळांनी तयार केल्या आहेत. संबंधित विद्याशाखांच्या बैठकींमध्ये या नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. NEP-2020 in RTMNU सोमवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू आदी उपस्थित होते. NEP-2020 in RTMNU अत्यंत कमी कालावधीमध्ये एन ईपी २०२० नुसार अभ्यासक्रमांची रचना करण्यात आल्याने विद्वत परिषदेने सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
प्रथम वर्षापासून सुरुवात NEP-2020 in RTMNU
आगामी २०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रात प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. आगामी शैक्षणिक क्षेत्रात द्वितीय व तृतीय वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा बदल लागू राहणार नाही. नवीन अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.
प्राचार्य- शिक्षकांना प्रशिक्षण NEP-2020 in RTMNU
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमांबाबत प्राचार्य- शिक्षकांमध्ये कार्यशाळा घेत जागृती केली जात आहे. यापूर्वी याबाबत कार्यशाळा पार पडली आहेत. आगामी काही दिवसांमध्ये प्राचार्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत (एनईपी-२०२०) बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून शिक्षकांना देखील प्रशिक्षित केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0