दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीत ठिय्या आंदोलन

07 Jun 2023 19:50:10
तभा वृत्तसेवा 
हिंगणघाट, 
तालुुक्यातील दिंडोरा बॅरेज (Dindora barrage) प्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी शेकापूर येथील नदीत सरकारच्या विरोधात निदर्शने करीत ठिय्या आंदोलन केले.
 
Dindora barrage
 
दिंडोरा बॅरेज (Dindora barrage) प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार 6 रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनातून प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले. मागील अनेक वर्षांपासून समितीच्या वतीने विविध आंदोलने करून प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी लढा देत आहे. दरम्यान, मंगळवारी शेकापूरच्या नदी परिसरात प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. निवेदन देण्यासाठी समितीच्या वतीने हिंगणघाट क्षेत्राच्या अभियंत्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, आंदोलनस्थळी एकाही अधिकार्‍याने हजेरी न लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी व समितीच्या वतीने नदीत ठिय्या मांडून निषेध नोंदविला.
 
 
या (Dindora barrage) आंदोलनात पुंडलिक तिजारे, अभिजित मांडेकर, चंपत साळवे, विलास भोंगाडे, प्रभू राजगडकर, किशोर खांडेकर, गौतम कांबळे, कैलास ठाकरे, जयंत लडके, राजू भोयर, मनोज कोसुरकर, विठ्ठल जुनघरे, मिथुन ठाकरे, अनिल मिसाळ, विद्या तिजारे, रेखा मांडेकर, मंजुषा लडके, माया भोयर, दुर्गा ठाकरे, वैशाली फुटाणे, नलू ताजणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार आदींसह दिंदोडा बॅरेज प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
 
Powered By Sangraha 9.0