तरुण भारतच्या ‘त्या’ बातमीने दिग्रस नगर परिषद भानावर

- नांदगव्हाण धरणाचे पाणी उपलब्ध होणार
- विभाग प्रमुखांनी मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश

    दिनांक :07-Jun-2023
Total Views |
अभय इंगळे 
दिग्रस, 
Tarun Bharat : ‘दिग्रसच्या पाणीटंचाईवर सारेच गप्प’ ही बातमी दोन दिवसापूर्वी म्हणजे 5 जूनला प्रसिद्ध होताच, नगर परिषद कार्यालय जणू भानावरच आले, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अभियंता थेट जलशुद्धीकरण केंद्रावरच पोहचले. मु‘याधिकारी ज्ञानेश सोनावणे यांनी तभाच्या बातमीची दखल घेत पाणीटंचाईच्या या काळात नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांना लेखी पत्र दिले की, आपण व आपल्या अधिनस्त सर्व कर्मचार्‍यांनी मु‘यालयात हजर रहावे, आणि कोणतीही मंजुरी न घेता रजेवर जाऊ नये अन्यथा आपल्यावर नागरी सेवानियमांनुसार कारवाई करण्यात येईल.
 
Tarun Bharat
 
पाणीटंचाईचा पूर्णपणे विसर पडलेल्या अनेक नगरसेवकांनी नप कार्यालयात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी फोन लावले, ही बाब मु‘याधिकार्‍यांनी बोलून दाखवली, तभाच्याच (Tarun Bharat) बातमीनेच नांदगव्हाण धरण ते नपच्या पाणीटाकी पर्यंत नवीन पाईपलाईन झपाट्याने टाकण्यास सुरवात झाली असून येत्या काही महिन्यांत तब्बल 18 वर्षार्ंनंतर नांदगव्हाण धरणाचे पाणी दिग‘सकर नागरिकांना प्यायला मिळेल असेे सोनावणे म्हणाले. दिग‘स शहरात पाणीटंचाईचा प्रश्नच उद्भवत नाही इतका जलसाठा उपलब्ध आहे. थोड्या तांत्रिक अडचणी, नप कर्मचार्‍यांची हलगर्जी व नपच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. नपकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्याच नाहीत. चारचार तास वीज भारनियमन आणि पाणीपुरवठा यंत्रणा कंत्राटदाराकडे सोपविल्याने तांत्रिक अडचणींशी सामना करावा लागत आहे.
 
 
2005 मध्ये नप मालकीचे नांदगव्हाण धरण फुटले तेव्हापासून नप सभागृहात धरण पुनर्बांधणीसाठी नप अध्यक्ष व नगरसेवकांत एकमत झालेच नाही. धरण पुनर्बांधणी होऊन 2 वर्षे झालीत. तेेथून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे नियोजन नपने केलेच नाही. अरुणावती पाटबंधारे विभागाला लाखो रुपये देऊन पाणी विकत घेणार्‍या नपने ते पाणी दररोज शहरात वितरित करणे आवश्यक आहे किंबहुना त्यातील अडचणी सोडविण्याला मु‘याधिकार्‍यांनी प्राधान्य देणे गरजेचे होते. तसे न झाल्याने शहरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणीकर भरणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. या पाणीटंचाईवर तरुण भारतात (Tarun Bharat) बातमी प्रसिद्ध झाली आणि दुसर्‍याच दिवसापासून सारेच भानावर आले. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. कधी नव्हे ते नप पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गौरव मांडळे जलशुद्धीकरण केंद्रावर ठाण मांडून बसले. अनेक अडचणी त्यांनी सोडविल्या, सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही त्यांनी तभाशी बोलताना दिली.