नाशिक,
Pandharpur Ringan : सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण पार पडले. जेसीबीच्या साहायाने यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा रिंगण सोहळा होता. ड्रोनच्या माध्यमातून पालखीचे अप्रतिम दृश्य टिपण्यात आले.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी दिंडी (Pandharpur Ringan) पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान सुरू झाले. सिन्नर शहरातून दातली शिवारात पालखी येताच जेसीबीच्या साहायाने पुष्पृष्टी करीत खंबाळे रस्त्यावरील मैदानात या पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. यात 43 दिंड्या व 15 ते 20 हजार वारकरी सहभागी झाले. यावेळी भर उन्हातदेखील गोल रिंगणात सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, विणेकरी क्रमानुसार गोलाकार उभे राहून विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत नाचू लागले होते. या तालातच भरधाव दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन केले. टाळ-मृदुंगाचा आलाप, विठूनमाचा जयजयकार आणि वेगाने धावणारे अश्व हे सारे विलोभनीय दृश्य बघण्यास मिळाले. रिंगणात मनसोक्त नाचणारे वारकरी आपला थकवा विसरून गेलेले असतात. पुढच्या प्रवासासाठी त्यांना रिंगणातून ऊर्जा मिळते.
मानाचा अश्व देहूकडे रवाना
संत तुकाराम महाराज (Pandharpur Ringan) पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व देहूकडे रवाना झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या बाभुळगावचे पालखी सोहळ्याचे चोपदार हभप निवृत्ती महाराज गिराम यांचा हा देवाचा अश्व आहे. हा मानाचा अश्व पालखी सोहळ्यात सामील होत रिंगणात धावणार आहे.