आता काळ्या हळदीची लागवड

    दिनांक :08-Jun-2023
Total Views |
- 3000 वर्षांपासून आदिवासी करीत आहेत वापर
- लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध
- आरोग्यासाठी अतिशय फलदायी

गया, 
काळ्या बटाट्याच्या यशस्वी लागवडीनंतर बिहारच्या गया जिल्ह्यात Kali-Halad काळ्या हळदीची लागवड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील टिकारी ब्लॉक परिसरातील गुलरियाचक गावातील प्रगतिशील शेतकरी आशिषकुमार सिंह यावर्षी दीड एकरात काळ्या हळदीची लागवड करीत आहेत. प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील आदिवासी समाजातील लोक 3000 वर्षांपूर्वीपासून या हळदीचा वापर करत आहेत आणि ती शुभ मानली जाते. एका हळदीचे वजन 100 ग‘ॅमपर्यंत आहे. ही हळद कोणत्याही हंगामात पिकवता येते, असे सिंह यांनी सांगितले.
 
 
Kali-Halad-1
 
आशिषकुमार सिंह हे शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी काळ्या बटाट्याची यशस्वी लागवड करून संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटवला असून आता काळ्या हळदीची लागवड सुरू केली आहे. आशिष सिंह यांनी 2021 मध्ये मध्य प्रदेशातून Kali-Halad काळ्या हळदीचे बियाणे मागवले होते. गेल्या 2 वर्षांपासून ते गया येथे काळ्या हळदीची लागवड करीत आहेत. काळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटिफंगल गुणधर्म आढळतात. त्यामुळे याला मोठी मागणी आहे. काळी हळद सामान्यत: औषधी बनवण्यासाठी वापरली जाते. 2016 मध्ये, भारतीय कृषी विभागाने काळी हळद ही लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध केली आहे. काळी हळद तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. तसेच शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता देण्यास सक्षम आहे.
 
 
 
आशिष कुमार सिंह यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, एका लेखातून त्यांना काळ्या हळदीची माहिती मिळाली. ही एक नामशेष होत चाललेली प्रजाती आहे. त्यामुळे ती वाढवण्याच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून ते तिची लागवड करीत आहेत. Kali-Halad काळ्या हळदीच्या बिया मध्यप्रदेशातून आणल्याचे त्यांनी सांगितले. गया कृषी विज्ञान केंद्र मानपूरचे कृषी शास्त्रज्ञ देवेंद्र मंडल यांनी सांगितले की, काळ्या हळदीमध्ये पिवळ्या हळदीपेक्षा 20 पट जास्त अँटीऑक्सिडंट आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात. काळी हळद कापल्यावर कापरासारखा वास येतो, त्यामुळे ती खाण्यासाठी वापरली जात नाही. काळ्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म असून अनेक रोग त्यापासून दूर होतात.