सनातन सेवेची शंभर वर्षे

    दिनांक :08-Jun-2023
Total Views |
कानोसा
 
 
- डॉ. संतोष कुमार तिवारी
सेवानिवृत्त प्राध्यापक
100 वर्षांपूर्वी म्हणजे एप्रिल 1923 मध्ये, गीता प्रेस, गोरखपूरची स्थापना प्रामुख्याने त्रुटीरहित गीता प्रकाशनासाठी करण्यात आली. पण आज ही देशातील आणि जगातील आघाडीची प्रकाशन संस्था आहे, जी ना जाहिराती प्रसिद्ध करते ना कोणाकडून देणगी घेते. गीता प्रेस सनातन धर्माची नि:स्वार्थ सेवा करीत आहे.
गेल्या शतकात जयदयाल गोयंदका (1885-1964) यांनी (Gorakhpur Gita Press) गोरखपूरमध्ये गीता प्रेसची स्थापना केली आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी आठव्या शतकात आदि शंकराचार्यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच अभूतपूर्व काम केले. शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी शृंगेरी मठ (रामेश्वरम), गोवर्धन मठ (पुरी), शारदा मठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (बद्रिकाश्रम) या चार मठांची स्थापना केली. जयदयाल गोयंदका भगवद्गीतेला समर्पित होते आणि गीता प्रेसची स्थापना प्रामुख्याने त्यावेळी उपलब्ध नसलेल्या गीतेच्या शुद्ध ग्रंथाच्या प्रकाशनासाठी करण्यात आली होती. गेल्या 100 वर्षांत गीता प्रेसच्या पुस्तकांमध्ये श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ सर्वाधिक लोकप्रिय ठरला. आतापर्यंत या ग्रंथाच्या 16 कोटींहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. त्यापाठोपाठ गीता प्रेसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये हनुमान चालिसाचा क्रमांक असून, या पुस्तकाच्या आजवर दहा कोटींहून अधिक प्रती छापल्या गेल्या आहेत. तिसर्‍या क‘मांकावर श्री रामचरितमानस आहे, ज्याच्या तीन कोटींहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
 
Gorakhpur Gita Press
 
गोयंदका यांची श्री हनुमान प्रसाद पोद्दार यांच्याशी झालेली भेट
ही कदाचित गेल्या शतकातील आध्यात्मिक (Gorakhpur Gita Press) भारतातील सर्वात मोठी घटना ठरावी. त्यानंतर स्वामी रामसुखदास, चिम्मनलाल गोस्वामी, स्वामी अखंडानंद सरस्वती (1911-1987) इत्यादी एकाहून एक दिग्गज महापुरुष गीता प्रेससोबत जुळत गेले.
 
 
72 कोटी पुस्तकांचे प्रकाशन
गीता प्रेसची स्थापना एप्रिल 1923 मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत वरील ग्रंथाव्यतिरिक्त महिला व बालकांसाठी उपयुक्त ग्रंथ, भक्तचरित्र, भजनमाला इत्यादी ग्रंथ प्रकाशित करीत आहे. आतापर्यंत सुमारे 72 कोटी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याशिवाय ‘कल्याण’ हे मासिकही नियमितपणे प्रकाशित होत आहे. दरवर्षी ‘कल्याण’चा विशेषांक प्रकाशित होतो, त्याची वाचक वाट पाहत असतात. यंदाचा 97 व्या वर्षाचा विशेष म्हणजे ‘दैवीसंपदा अंक’ आहे.
 
 
2021 मध्ये गीता प्रेसने पुस्तकप्रेमी (Gorakhpur Gita Press) आणि यात्रेकरूंसाठी ‘अयोध्या-दर्शन’ प्रकाशित केले. 128 पानांचे हे पुस्तक अनेक सुंदर, रंगीत चित्रांसह अयोध्येतील मुख्य ठिकाणांची थोडक्यात ओळख करून देते. यासोबतच अयोध्येचे शास्त्रीय महत्त्व आणि इतिहासाशी संबंधित माहितीही त्यात थोडक्यात देण्यात आली आहे. यात राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्याच्या पृष्ठभूमीबाबतही थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. गीता प्रेसच्या पुस्तकांची आणि ‘कल्याण’ची विक्री 21 खाजगी घाऊक दुकाने, सुमारे 50 रेल्वे स्टेशन-स्टॉल्स आणि हजारो पुस्तक विक‘ेत्यांकडून केली जाते. या पुस्तक विक्रेत्यांना नवीन प्रकाशनांची माहिती देण्यासाठी गीता प्रेस गेली जवळपास 9 वर्षे ‘युग-कल्याण’ हे मासिक काढत आहे. गीता प्रेसच्या 1800 हून अधिक प्रकाशनांपैकी सुमारे 750 हिंदी आणि संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित प्रकाशने प्रामु‘याने गुजराती, मराठी, तेलगू, आसामी, बांगला, ओडिया, तामिळ, कन्नड, मल्याळम, पंजाबी, उर्दू, इंग्रजी इत्यादी भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होतात. श्रीरामचरितमानस सारखी काही पुस्तके गीता प्रेसमध्ये नेपाळी भाषेतही प्रकाशित झाली आहेत.
 
 
आता रोमन लिपीत पुस्तके
देशात आणि जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांना फक्त इंग्रजी येते, परंतु त्यांना धार्मिक ग्रंथ हिंदी किंवा संस्कृतमध्ये वाचायचे आहेत. त्यांच्याकरिता गीता प्रेस रोमन लिपीत हनुमान चालीसा, (Gorakhpur Gita Press) श्रीरामचरितमानस, श्रीमद्गवद्गीता इत्यादी प्रकाशित करते, ज्यात इंग‘जी अनुवादसुद्धा दिलेला आहे. आतापर्यंत हनुमान चालिसाच्या सुमारे साडेपाच लाख प्रती रोमन लिपीत प्रकाशित झाल्या आहेत, तर देवनागरी लिपीतील 75 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. श्रीरामचरितमानसचे सुंदरकांड रोमन लिपीत उपलब्ध आहे.
 
 
आर्थिक संकट नाही
गीता प्रेस बंद होणार असल्याच्या अफवा काही खोडकर घटकांकडून सोशल मीडियावर अनेकदा पसरवल्या जातात. पण वस्तुस्थिती ही आहे की, गीता प्रेसवर कोणतेही आर्थिक संकट नसून, ही संस्था बंद होणार नाही. काही लोकांना परिस्थितीचा फायदा घेत, देणग्या गोळा करायच्या आहेत व स्वतःचे खिसे भरायचे असल्याने, त्यांच्याकडून ही प्रेस बंद झाल्याच्या अफवा सातत्याने पसरवल्या जातात. खरे तर गीता प्रेस कोणाकडून देणग्या घेत नाही. गीता प्रेस ही भारतातीलच नव्हे तर जगातील एक आघाडीची प्रकाशन संस्था आहे. या प्रकाशन संस्थेने तीन-चार वर्षांपूर्वी, जर्मनीकडून 11 कोटी रुपयांचे बुक बाइंडिंग मशीन आणि मार्च 2021 मध्ये जपानकडून सुमारे 6 कोटी रुपयांचे चार रंगांचे ऑफसेट प्रिंटिंग मशीन विकत घेतले आहे. त्यामुळे पुस्तकांच्या उत्कृष्ट छपाईची आणि बांधणीची योग्य काळजी घेतली जाते.
 
 
दरवर्षी 60 कोटी पुस्तकांची विक्री
गीता प्रेसचे विश्वस्त देवी दयाळ अग्रवाल यांनी या (Gorakhpur Gita Press) लेखकाला दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये माहिती दिली होती की, दरवर्षी आमची सुमारे 60 कोटी रुपयांची पुस्तके विकली जातात. याशिवाय 4-5 कोटी रुपयांची ‘कल्याण’ची विक्री होते. छपाईसाठी वर्षाला सुमारे 4.5 ते 5 हजार मेट्रिक टन कागदाचा वापर होतो. गीता प्रेसमध्ये सुमारे 185 नियमित आणि सुमारे 200 कंत्राटी कामगार काम करतात. कंत्राटी कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) इत्यादी फायदेही मिळतात.
 
 
डॉ. राजेंद्र प्रसादही वाचक होते
डॉ. राजेंद्र प्रसाद 1943 मध्ये बंकीपूर तुरुंगात असताना त्यांनी आपल्या फावल्या वेळेत गीता प्रेसची आध्यात्मिक पुस्तके वाचण्यास प्राधान्य दिले आणि श्री भाईजींना आपले आध्यात्मिक गुरू मानले. (भाईजी : पावन स्मरण, दुसरी आवृत्ती, गीता वाटिका प्रकाशन, गोरखपूर, पृष्ठ 233). नंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी 29 एप्रिल 1955 रोजी गीता प्रेसला भेट दिली. त्यांनी प्रेसच्या प्रवेश द्वाराचे आणि लीला चित्र मंदिराचे उद्घाटन केले. या (Gorakhpur Gita Press) प्रवेश द्वारावर भारतीय संस्कृती, धर्म आणि कलेची प्रतिष्ठा जोपासली गेली आहे. त्याच्या बांधकामात भारतातील प्राचीन कला आणि मंदिरांपासून प्रेरणा घेण्यात आली आहे. लीला चित्र मंदिरात प्रतिभावान चित्रकारांनी हाताने रंगवलेल्या चित्रांव्यतिरिक्त भगवान श्री राम आणि श्री कृष्ण यांच्या लीलांच्या 684 आकर्षक चित्रांचा संग‘ह आहे. येथील भिंतींवर संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता आणि संतांचे 700 हून अधिक दोहे व कथने अंकित केलेली आहेत.
 
 
श्री चंद्रदीपजी ‘भाईजी : पवित्र स्मृती’ या पुस्तकात लिहितात, ‘‘मला अडीच वर्षे श्री भाईजींच्या सान्निध्यात राहण्याचे सौभाग्य लाभले. 1936 च्या ऑगस्टच्या भेटीत मी पाँडेचेरीला जाण्याची तयारी करू लागलो. त्या दिवसांत गोरखपूर जिल्ह्यात भीषण पूर आला होता आणि श्री भाईजी मदत कार्यात व्यस्त होते. (Gorakhpur Gita Press) रात्रंदिवस त्यांचा सर्व वेळ याच कामात जायचा. त्यांना भेटणेही शक्य नव्हते. गोरखपूरमध्ये कुष्ठरोगी गृहाच्या स्थापनेतही भाईजींनी खूप सहकार्य केले आहे. ‘गीता प्रेस सेवा दल’ आजही दुष्काळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीग‘स्तांसाठी शक्य तितकी सेवा देते. गीता प्रेसने कोरोनाच्या काळात स्थलांतरित मजूर आणि गरिबांना दररोज अन्नाची पाकिटे वाटली. तसेच रेशन इत्यादी वाटपाची व्यवस्था केली. उत्तराखंड आणि गुजरातमधील भूकंपाच्या वेळीही गीता प्रेस सेवा दलाने योगदान दिले. अशी मदत केदारनाथ धाम पूरप्रकोपातही करण्यात आली.
 
 
गीता प्रेसचे सेवाकार्य
गीताभवन-स्वर्गाश्रम : येथे 1000 हून अधिक खोल्या आहेत. येथे दैनंदिन सत्संग, साधकांसाठी निवास, मोफत आयुर्वेदिक औषधे आणि अल्पदरात भोजनाची व्यवस्था आहे. साधूंना अन्न आणि वस्त्र आदी मोफत दिले जाते.
 
गीताभवन आयुर्वेद संस्थान : येथे आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. कोलकाता, गोरखपूर, चुरू (राजस्थान), सुरत (गुजरात), गोरखपूर इत्यादी ठिकाणी मोफत आयुर्वेदिक उपचारांची व्यवस्था केली जाते.
 
ऋषीकुल ब्रह्मचर्य चुरू (राजस्थान) : येथे ब्रह्मचार्‍यांसाठी मोफत शिक्षण, निवास, वैद्यकीय उपचार उपलब्ध असून, अल्प मासिक शुल्कावर भोजनाची व्यवस्था केली जाते.
 
 
गोविंद भवन-कार्यालय, कोलकाता : हे (Gorakhpur Gita Press) संस्थेचे मुख्य कार्यालय असून, येथे नित्य गीता पाठ तसेच संत आणि महात्म्यांच्या प्रवचनांचे आयोजन केले जाते. येथे गीता प्रेसची पुस्तके, आयुर्वेदिक औषधे, कपडे आणि हिंसारहित शुद्ध वस्तूंची रास्त दरात विक्री केली जाते. गीता प्रेसची कपड्यांची दुकाने गोरखपूर, कानपूर आणि इतर शहरांमध्येही आहेत. गीता-रामायण-परीक्षा समिती, साधक संघ, नाम-जप-विभाग हे गीता प्रेसचे इतर विभाग आहेत.
 
 
गोरखपूरमध्ये गीता प्रेसची स्थापना करून जयदयाल गोयंदका यांनी सनातन धर्माचा जो प्रकाश निर्माण केला तो आज संपूर्ण जगात सतत वाढत आहे. आज गीता प्रेस केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक अग‘गण्य प्रकाशन गृह बनले आहे. या काळात गीता प्रेसच्या मार्गात अडथळे आले नाहीत, असे नव्हे, परंतु गोयंदकाजींचा असा ठाम विश्वास होता की, चांगल्या आणि पुण्य कार्यात देवही भरभरून मदत करतो.
 
 
भाईजी आणि गांधीजी
भारतीय दिनदर्शिकेनुसार, (Gorakhpur Gita Press) भाईजी श्री हनुमान प्रसाद पोद्दार यांचा जन्म अश्विन कृष्ण द्वादशी विक्रम संवत 1949 रोजी झाला. तर महात्मा गांधींचा (1869-1948) जन्म अश्विन कृष्ण द्वादशी विक‘म संवत 1926 रोजी झाला होता. हे दोघे 23 वर्षांच्या फरकाने या जगात आले आणि परमेश्वराने नेमून दिलेले कार्य करून 23 वर्षांच्या फरकानेच हे जग सोडून गेले. दोघांचे परस्परांवर निरतीशय प्रेम होते. दोघेही आपापल्या क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचले. दोघेही गोहत्या आणि धर्मांतराच्या विरोधात होते. गांधीजींनी देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला असला तरी भाईजींनी विरोध केला. गीता प्रेस नेहमीच ‘कल्याण’च्या माध्यमातून समाजकंटकांना विरोध करत आली आहे.
 
 
अ‍ॅपवर मोफत पुस्तके
काही वर्षांपूर्वी गीता प्रेसहून निराळी गीता सेवा ट्रस्ट ही स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. त्यांनी गीता सेवा नावाचे अ‍ॅप देखील सुरू केले आहे, ज्यावर गीता प्रेसने प्रकाशित केलेली सुमारे 250 पुस्तके वाचता किंवा ऐकता येतात. त्यावर रामचरितमानस, हनुमान चालीसा याशिवाय जवळपास संपूर्ण तुलसी साहित्य, (Gorakhpur Gita Press) श्री जयदयाल गोयंदका, भाईजी आणि स्वामी रामसुखदास यांची पुस्तके आणि या महान व्यक्तींचे 12,500 हून अधिक प्रवचने त्यांच्या मूळ आवाजात ऐकता येतात. या अ‍ॅपवर गीता प्रेसची इतर पुस्तके अपलोड करण्याचे काम सुरू आहे.