तीस्ता सेटलवाडला आत्मसमर्पण करण्याचे निर्देश!

गुजरात हायकोर्टाने जामीन नाकारला

    दिनांक :01-Jul-2023
Total Views |
गांधीनगर,  
Teesta Setalvad गुजरात हायकोर्टाने तीस्ता सेटलवाडला ताबडतोब आत्मसमर्पण करण्याचे निर्देश देताना, गेल्या वर्षी दाखल केलेली नियमित जामीन याचिका फेटाळून लावली. सेटलवाड यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यासह माजी डीजीपी आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस संजीव भट्ट हेही या प्रकरणात आरोपी आहेत. गुजरात पोलिसांनी या दोघांना गेल्या वर्षी 25 जून रोजी अटक केली होती.
 
TY
 
 
तुरुंगात गेल्यानंतर तीस्ता सेटलवाड Teesta Setalvad यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना अंतरिम जामीनही मिळाला. यानंतर ती तुरुंगातून बाहेर आली. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तीन आरोपी, तीस्ता सेटलवाड, आयपीएस श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांच्यावर पुरावे तयार केल्याचा आणि निरपराध लोकांना गोवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 468, 471 फसवणूक आणि 194 पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलम 211 शिवाय निरपराध लोकांना अडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.