रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करा

माजी आ. अग्रवाल यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

    दिनांक :01-Jul-2023
Total Views |
गोंदिया, 
train schedule मागील काही महिन्यापासून प्रवासी रेल्वेगाड्या उशीरा धावत असल्याने होणारा त्रास तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आरक्षीत डब्ब्यात सर्वसामान्य तिकीट व मासिक पासकर्त्यांना होणारा त्रास दूरावा, अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
 
GYTYG
 
निवेदनानुसार, कोरोना संसर्ग train schedule आटोक्यात आल्यानंतर जवळपास सर्वच प्रवासी रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. मात्र मागील काही महिन्यापासून मालगाड्यांना प्राधान्य देत पहिले त्यांना सोडले जाते. यासाठी प्रवासी गाड्या शहराबाहेर थांबविल्या जात आहे. त्यामुळे स्थानिक व अन्यत्र प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत करण्यात यावे. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत डब्ब्यांमध्ये सर्वसामान्य तिकीट व मासिक पासधारकांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी नागपूर येथे पोहोचल्यावर जवळपास पूर्ण रिकामी होते. त्यामुळे गोंदिया ते नागपूर दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेसच्या आरक्षीत डब्ब्यात सर्वच तिकीटधारकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. यासंदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना देण्याची मागणी केली आहे.