नागपूर,
महा बास्केटबॉल संघटना (Deccan Gymkhana Pune team) आणि जी.एच. रायसोनी स्पोट्र्स अॅण्ड कल्चरल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ बाय ३ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत डेक्कन जिमखाना पुणे संघाने महिला व १८ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धीला नमवित स्पर्धेत विजेतेपदाचे दुहेरी यश प्राप्त केले.
नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या यजमानपदाखाली शिवाजीनगर जिमखानाच्या कोर्टवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात डेक्कन जिमखाना पुणे संघाने एमएसयू मुंबई संघाला २१-७ गुणफरकाने पराभूत केले. (Deccan Gymkhana Pune team) पुणेच्या दुर्गा धर्माधिकारी व आर्या रिसवाडकरने प्रत्येकी ७ तर मुंबईच्या प्रिती यादवने ४ गुण नोंदविले. १८ वर्षांखालील मुलांच्या अंतिम लढतीत डेक्कन जिमखाना मुंबई संघाने चुरशीच्या लढतीत पोगो नागपूर संघाला १६-१५ गुणफरकाने पराभवाचा धक्का दिला. पुणेच्या सिद्धांत जोशीने ६ तर नागपूरच्या यश मेहताने ७ गुण केले. स्पर्धेत पुरुष गटात सातारा जिमखानाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत डीजी पुणे संघाला २१-१५ गुणफरकाने नमवित बाजी मारली. साताèयाच्या निखिल पाटीलने १०, आशीष जाधवने ५ तर पुणेच्या राजेद्र qसगने ७ गुण केले. १८ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात सीपीएसए पुणे संघाने अटीतटीच्या लढतीत सरदार दस्तूर पुणे संघाला १३-१२ गुणफरकाने पराभूत करीत विजेतेपद पटकाविले. सीपीएसएच्या मनसी निर्मळककरने ११ आणि सरदार दस्तूर संघाच्या भुमिका सर्जेने ६ गुण नोंदविले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात चारही गटातील विजेत्या, उपविजेत्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघाला (Deccan Gymkhana Pune) team महा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, कोषाध्यक्ष जयंत देशमुख, सचिव शत्रुघ्न गोखले, रायसोनी ग्रुपचे जय यादव आणि स्पर्धेचे संयोजक अमित संपत यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.