- मनोहरपुत्र ययाती नाईकांचा अद्याप निर्णय नाही
रवी देशपांडे
पुसद,
अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला समर्थन दिले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि आठ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांमध्ये पुसदच्या इंद्रनील Naik family मनोहर नाईकांचा समावेश आहे.
2019 पासून राकाँचे सर्वेसर्वा शरद पवारांची साथ सोडण्याचा मनोहर नाईकांचा इरादा आहे हे सर्वश्रुत आहे. अखेर तसा मुहूर्त मिळालाच. नुकताच अजित पवारांना विदर्भातील राकाँचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईक आणि आमदार इंद्रनील नाईक यांनी पाठिंबा जाहीर केला. परंतु नाईक परिवारातील सर्व सदस्य या निर्णयाशी सहमत नाहीत असे खात्रीलायकरित्या समजते. मनोहर नाईकांचे ज्येष्ठ सुपुत्र यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बाबासाहेब नाईक सहकारी सूतगिरणीचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक ययाती Naik family नाईक यांनी ‘तरुण भारत’शी या राजकीय घडामोडींबद्दल जाहीर मत व्यक्त केले असून अद्याप आपण तटस्थ आहोत, असे आवर्जून सांगितले.
Naik family नाईक परिवाराच्या तिसर्या पिढीचे वारस ययाती नाईक निकट भविष्यात कोणता निर्णय घेतात हे गुलदस्त्यात असून तूर्त तरी अजित पवारांसोबत गेलेल्यांच्या यादीत आपण नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे नाईक परिवारात आणखी फूट पडणार काय, असा प्रश्न परिसरतील जनतेला पडला आहे. गेल्या दहा वर्षांपासून पुतणे निलय नाईक हे मनोहर नाईक यांच्याशी काडीमोड करून भाजपावासी बनलेले आहेत. आता ययातीनेही एकप्रकारे बंडाचे निशाण उभारले आहे. अजित पवारांसोबत भाजपा-सेना सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयाला पुसदमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक नेत्यांचा विरोध आहे. याबाबत काही शरद पवारनिष्ठ मुंबईला जाऊन भूमिका मांडतील अशी चर्चा आहे. त्यामुळे आमदार इंद्रनील नाईकांच्या निर्णयाला पुसदमध्ये नेमका किती प्रतिसाद किंवा पाठिंबा मिळेल याची राजकीय विश्लेषकांना उत्सुकता आहे.