तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँकेच्या Urban Co-operative Bank अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत एकता पॅनल समर्थित मोहन कुंभारे आणि उपाध्यक्ष म्हणून शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष रामदास खेकारे यांची आज मंगळवार 11 रोजी निवड झाली.
वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज (अर्बन) को-ऑपरेटिव्ह बँकेच्या Urban Co-operative Bank 14 संचालकांसाठी 25 जून रोजी निवडणूक झाली. यात 14 संघटना एकत्र आलेल्या समृद्धी पॅनलचे 8 संचालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरस्कृत एकता पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले. आज बँकेच्या सभागृहात झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकता पॅनलने समर्थन दिलेले मोहन कुंभारे अध्यक्ष आणि शिक्षक समितीचे वर्धा जिल्हाध्यक्ष रामदास खेकारे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. बहुमत असुनही हेकेखोरपणा व धमकी या प्रकारामुळे सत्तेपासून समृद्धी पॅनल दूर राहिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे Urban Co-operative Bank यांच्या नेतृत्वाखाली अजय काकडे, रविंद्र राठोड, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, प्रदीप देशमुख, सुधीर सगणे, राजू महाबुधे, चंद्रशेखर ठाकरे, प्रशांत निंभोरकर, राकेश साटोणे, सुवर्णा अहेरराव, संतोष डंभारे, अतुल उडदे, आदींनी अभिनंदन केले आहे.