दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी डॉ. राजेंद्र गवई

12 Jul 2023 16:18:47
नागपूर,
 
Dr.Rajendra Gawai आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या ११ जुलै रोजी संपन्न झालेल्या बैठकीत डॉ. राजेन्द्र गवई यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. Dr.Rajendra Gawai समितीचे विद्यमान सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी प्रकृतीच्या कारणामुळे सचिव पदाचा राजीनामा दिला होता.  Dr.Rajendra Gawai त्यावर आजच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा होऊन डॉ. सुधीर फुलझेले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
 
 
Dr.Rajendra Gawai
 
सचिव पदासाठी डॉ. राजेन्द्र गवई यांचे नाव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सुचविले. Dr.Rajendra Gawai त्यांना विलास गजघाटे यांनी अनुमोदन दिले. सभेत उपस्थित समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई, डॉ. कमल गवई, एन. आर. सुटे, प्राचार्य डी. जी. दाभाडे, ॲड. आनंद फुलझेले, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विलास गजघाटे आणि भन्ते नागदीपंकर यांनी डॉ. राजेन्द्र गवई यांचे सचिवपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
 
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0