रश्मी पदवाड मदनकर यांच्या साहित्यकृतीचा गौरव

Rashmi Padwad-Madankar मसाप दामाजीनगरचे पुरस्कार जाहीर

    दिनांक :15-Jul-2023
Total Views |
नागपूर,
 
Rashmi Padwad-Madankar महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्या वतीने देण्यात येणार्‍या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांनी केली. यात नागपुरातील लेखिका रश्मी पदवाड मदनकर ह्यांच्या २०२२ मध्ये प्रकाशित पद्मकोश या पत्ररूप चरित्रात्मक कादंबरीला पंढरीनाथ जोशी पुरस्कृत मोहन भास्कर जोशी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Rashmi Padwad-Madankar या पुरस्कारांची निवड डाॅ. दत्ता सरगर यांच्या अध्यक्षतेखालील रेखा जडे, प्रा. विश्वनाथ ढेपे, भारती धनवे आणि सचिन गालफाडे यांच्या समितीने केली आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. Rashmi Padwad-Madankar सर्व पुरस्कार विजेत्यांचे शाखा अध्यक्ष प्रकाश जडे यांनी अभिनंदन केले असून, सदर पुरस्कारांचे वितरण लवकरच मान्यवरांचे हस्ते समारंभपूर्वक होईल असे सांगितले.
 
 

Rashmi Padwad Madankar 
 
 
 
Rashmi Padwad-Madankar खालील साहित्यकृतींना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. १) नाती वांझ होताना (कवितासंग्रह) मनीषा पाटील-हरोलीकर -देशिंग हरोली, २) तुकोबा (कवितासंग्रह) डाॅ. राजेंद्र दास, कुर्डुवाडी, ३) राजकीय मानदंड भाई गणपतराव देशमुख (चरित्र) प्रा. डाॅ. किसन माने, सांगोला, ४) हिप्पोक्रेटिसची शपथ (कादंबरी), डाॅ. ऊर्मिला चाकुरकर, पैठण, ५) हरवलेल्या कथेच्या शोधात (कथासंग्रह), सिताराम सावंत, सांगोला, ६) मुक्ता (कादंबरी) प्रतिभा जगदाळे, सांगली, ७) पिपाणी - (ललित) विजय शेंडगे, पुणे, ८) पद्मकोश (कादंबरी) रश्मी पदवाड- मदनकर, नागपूर, ९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता - प्रा. डाॅ. संभाजी पाटील (संशोधनात्मक संपादन) लातुर, १०) ग्रामीण कादंबरीतील स्री प्रतिमा- प्रा. डाॅ. संतोष देशमुख (संशोधनात्मक) औरंगाबाद, ११) सुरस धातू गाथा, प्रा. डाॅ. सुनील विभुते (बालसाहित्य) बार्शी, १२) हिरवी हिरवी झाडे- प्रा. सुभाष कवडे (बालसाहित्य) भिलवडी, १३) यशवंती शिंदे (मंगळवेढा) आणि १४) कल्याणराव शिंदे (पंढरपूर) Rashmi Padwad-Madankar
 
 
सौजन्य: रश्मी पदवाड मानकर, संपर्क मित्र