दिग्विजयसिंह यांच्या विरोधात याचिका

16 Jul 2023 18:34:32
वाराणसी, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या संदर्भात समाज माध्यमावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह (Digvijay Singh) यांच्याविरोधात खासदार-आमदारांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काशी प्रदेश सेलचे संयोजक शशांक शेखर त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल केल्यानंतर शशांक त्रिपाठी म्हणाले की, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) अलका यांच्या न्यायालयात या प्रकरणासंदर्भात शनिवारी याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने 18 जुलै ही बयाण आणि पुरावे नोंदवण्याची तारीख निश्चित केली आहे.
 
Digvijay Singh
 
त्रिपाठी यांनी आरोप केला आहे की, (Digvijay Singh) दिग्विजयसिंह यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे श्रीगुरुजींबद्दल बनावट फोटो आणि दिशाभूल करणारी तथ्यहीन माहिती प्रकाशित आणि प्रसारित करून सामाजिक द्वेष निर्माण केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा डागाळली. समाजात शत्रुत्व निर्माण करण्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दिग्विजयसिंह हे जाणूनबुजून अशा खोट्या गोष्टींचा प्रचार करत आहेत, असे ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0