मंगरुळनाथ,
corner of bridge collapsed तालुक्यातील पावसामुळे अडाण नदीला आलेल्या पुरामुळे सती आई मार्गाकडे जाणार्या पुलाचा एका बाजूचा कोपरा खचल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, सबंधित विभागाने त्वरीत पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.मंगरुळनाथ तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून, सततच्या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आला आहे. अडाण नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचा कोपरा खचला.
शेलुबाजारची ग्राम दैवत मा सती आई मंदिरामध्ये जाण्यासाठी दळणवळणचा मुख्य रस्ता आहे. corner of bridge collapsed खेड्यापाड्यातून येणारे भाविक भक्त या मार्गावरून सतत मोठ्या संख्येने दर्शन घेण्याकरिता जात असतात. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.