तभा वृत्तसेवा
पुसद,
‘मोदी ऽ 9’ महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार पुसद विधानसभा अंतर्गत, आमदार अॅड. नीलय नाईक MLA Nilay Naik यांच्या नेतृत्वात साई मंदिराच्या परिसरात टिफीन बैठक उत्साहात पार पडली. साई मंदिर परिसरात शनिवारी दुपारी 12 वाजता झालेल्या बैठकीत प्रारंभी आमदार अॅड. नीलय नाईक यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी टिफीन बैठकीत गोलाकार बसून चर्चा करीत भोजनाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विविध आघाड्यांचे नेते, प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामु‘याने MLA Nilay Naik आमदार अॅड. नीलय नाईक, नीळकंठ पाटील, अविनाश देशमुख, अनिरुद्ध चोंढीकर, अमेय नाईक, नंदकुमार काळे, दीपक परीहार, गुलाब जाधव, निखिल चिद्दरवार, सुधाकर ठाकरे, पंडित घाडगे, सुधाकर कांबळे, सुनील टेमकर, राजाभाऊ देशमुख, डॉ. चंदेल, गजानन बोक्से, शंकर चव्हाण, भाऊसाहेब देशमुख, योगेश राजे, पंजाब भोयर, ओमप्रकाश शिंदे, महेश मिश्रा, प्रतीक पाटील, सौरभ जयस्वाल, अर्णव रामावत, शुभम काळबांडे, मोना आडे, महिलांमध्ये डॉ. आरती फुपाटे, डॉ. रूपाली जयस्वाल, पल्लवी देशमुख, अॅड. जयश्री देशमुख यांचा समावेश होता.