जनरल डब्यासमोर जनता फूड काउंटरची सुरुवात

19 Jul 2023 21:25:37
नागपूर, 
रेल्वे ही सर्वसामान्यांच्या जीवनाची लाइफलाइन (Nagpur station Food stalls) मानली जाते. यातून दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने आता फलाटावर जनता फूड काउंटर उभारले आहे. अशा जनता फूड काउंटरची सुरुवात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया, रायपूर,बिलासपूर येथे झाली आहे. येत्या महिन्याभरात हीच सुविधा नागपूर रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
Nagpur station Food stalls
 
20 रुपयात जेवणाचे पॅकेट
रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणार्‍यांना यामुळे मोठी सुविधा मिळाली आहे. (Nagpur station Food stalls) नव्या प्रणाली अंतर्गत रेल्वे प्लॅटफॉर्मवर जनता फूड काउंटर उभारल्या जात आहे. सामान्य डब्यातून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना फलाटावरील जनता फूड काउंटरमध्ये 20 रुपयात जेवण विकत घेता येते. जेवणाचे पॅकेट, पिण्याचे पाणी सुध्दा येथे दिल्या जात आहे. रेल्वेगाड्यांच्या जनरल डब्यातील प्रवाशांना परवडणार्‍या दरात दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्याने अनेकांची सोय झाली आहे.
 
 
गर्दीच्या स्थानकावर ही सुविधा
नागपूरसह देशातील 64 निवडक आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ट्रेनच्या जनरल डब्यासमोर (Nagpur station Food stalls) जनता फूडचे स्टॉल्स लावण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया,रायपूर व बिलासपूर नंतर आता अन्य गर्दीच्या स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. जेवण पुरवण्यासाठी जनरल कोचजवळ विशेष काउंटर लावण्यात येत आहे.जनता फूड स्टॉल्समध्ये 7 पुरी, सुक्या बटाट्याची भाजी आणि लोणचे एका बॉक्समध्ये प्रवाशांना दिल्या जात आहे.
Powered By Sangraha 9.0