नागपूर,
नागपूर रेल्वे स्थानकावर (Nagpur railway station) प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वेने आता स्थानकावर अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वेने पुनर्विकास कार्याची योजना आखली असून यासाठी 487.77 कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. हेरिटेज इमारतींची स्वरूप कायम ठेवून रेल्वे स्थानकाचा संपूर्ण कायापालट केल्या जात आहे.
यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या सुविधांसाठी रुफ प्लाझा, 28 रॅम्प आणि 31 एस्केलेटर व्दारे रेल्वेचा परिसर अधिक सुविधाजनक करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकात रॅम्प, एस्केलेटर आदींसह तळघर पार्किंग, प्रतिक्षालय, सीसीटीव्ही आदींची सुविधा मिळणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात अपंग प्रवाशांना कोणताही त्रास होवू नयेत,यासाठी वेगळी व्यवस्था केल्या जाणार आहे. (Nagpur railway station) मुख्य रेल्वे स्थानकावरुन मेट्रो स्टेशन पर्यंत जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार केल्या जात आहे. एकाच स्थळावरुन रेल्वे, मेट्रो, शहर बस आणि ऑटो ,कॅब आदींची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
ग्रीन बिल्डिंगचे स्वरुप
मध्यवर्ती रेल्वे स्थानकाला ग्रीन बिल्डिंगचे स्वरुप दिल्या जाणार आहे.यात प्रामुख्याने पर्यावरणाचा विचार करण्यात आला आहे. स्थानकाच्या वर सौर ऊर्जा युनिट, पाणी वाचविण्यासाठी अनोखे संचाव्दारे जलसंवर्धन होणार आहे. (Nagpur railway station) पावसाळयात पावसाचे पाणी वाया जाण्याऐवजी पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग इतर ठिकाणी केल्या जाणार आहे.
जागतिक दर्जाची सुविधा
रेल्वे स्थानक परिसरात काही कामे पूर्ण होत असून बॅचिंग प्लांट, साइट लॅब, नवीन ठिकाणी साइडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेस्थानकाला नवे स्वरुप प्राप्त होणार आहे. (Nagpur railway station) नागपूर रेल्वे स्थानकाच्या या पुनर्विकास कामामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध होणार आहे.