गोंडवाना विद्यापीठाच्या लिपिकाने मिळविली आचार्य पदवी

21 Jul 2023 19:10:24
गडचिरोली, 
Gondwana University स्थानिक गोंडवाना विद्यापीठात उच्च श्रेणी लिपिक या पदावर कार्यरत प्रियांका दिलीप मुसळे यांनी मानव विज्ञान विद्याशाखेअंतर्गत आचार्य पदवीसाठी शोध प्रबंध सादर केला होता. त्या शोधप्रबंधाच्या परिक्षणानंतर गोंडवाना विद्यापीठाने त्यांना आचार्य पदवी बहाल केली होती. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रियांका मुसळे यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
 

Gondwana University 
 
गोंडवाना विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनराज पाटील यांच्या मार्गदर्शनात ‘गडचिरोली जिल्ह्यातील माडीया आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती: एक समाजशास्त्रीय अध्ययन’ या विषयावर संशोधन केले होते. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई सिंधू मुसळे, भाऊ डॉ. आशिष मुसळे, पती डॉ. नंदकिशोर मने तसेच मने व मुसळे परिवाराला दिले आहे. Gondwana University कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. परिश्रम व अभ्यास करून प्रियंका मुसळे यांनी आचार्य पदवी मिळविली आहे.
 
Powered By Sangraha 9.0