मणिपूरच्या दुसरा video...शिरच्छेद अन् बांबूला लटकवले मुंडके
21 Jul 2023 15:03:16
इंफाळ
Manipur head hanging मणिपूरमध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला हिंसाचार दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिंसाचार आणि सामूहिक बलात्काराच्या वेळी दोन कुकी महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याबाबत संसदेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वत्र गदारोळ सुरू आहे. या व्हिडिओच्या अवघ्या 2 दिवसांनंतर, मणिपूर हिंसाचाराचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो तुम्हाला नक्कीच धक्का देईल. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचे डोके कापून बांबूला लटकवले आहे.
मणिपूरमध्ये शांतता असल्याचा दावा केला जात होता, मात्र कुकी समाजातील महिलांचा नग्न फिरण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जातीय तणावाचे वातावरण पुन्हा एकदा शिगेला पोहोचले आहे. रिपोर्टनुसार, 4 मे रोजी महिलांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. मेईतेई समाजातील महिलांनी हा गैरवर्तन घृणास्पद असल्याचे जाहीर केले होते. Manipur head hanging मीतेई महिलांची सर्वात मजबूत संघटना मीरा पायबीच्या सदस्यांनी थौबल जिल्ह्यातील पच्ची गावात असलेल्या या घटनेतील मुख्य आरोपी हुइरेम हेरोदास मेईतेईचे घर पेटवून दिले. मणिपूरमध्ये 3 मे पासून सुरू झालेल्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50,000 हून अधिक लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले गेले आहे. मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार करणाऱ्यांविरोधात आतापर्यंत 6000 हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. दंगलीच्या तपासासाठी मणिपूर पोलिसांचे 2000 हून अधिक उपनिरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.