कौटुंबिक पक्षांचे महाभारत !

21 Jul 2023 17:41:16
दृष्टिक्षेप
 
- उदय निरगुडकर
 
NDA vs INDIA सरत्या आठवड्यात दोन महत्त्वाच्या राजकीय बैठका झाल्या. एक बंगळुरूला युपीएची आणि दिल्लीला एनडीएची. एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच होतं हे. ती एक राजकीय गरज होती. कारण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दोन प्रमुख तंबूंमध्ये मित्रपक्षांना आणण्याची स्पर्धा सुरू आहे. अचानक सर्वच पक्ष लवचिक बनले आहेत. NDA vs INDIA समोरचा पक्ष कितीही छोटा असला, अगदी विरोधी मताचा असला, तरी समान दुवे शोधून काढले जात आहेत. कॅमे-यासमोर मिठ्या मारल्या जाताहेत. सुहास्यवदनाने आलिंगने दिली जात आहेत, मेजवान्या रंगताहेत. २०२४ च्या निवडणुकांचा माहोल रंग भरू लागला आहे. NDA vs INDIA त्यातच बंगळुरूच्या बैठकीत युपीएचे ‘इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्युझिव्ह अलायन्स' अर्थात ‘इंडिया' असे पुनर्नामकरण करण्यात आले. बंगळुरूमध्ये नामकरणाचा पाळणा हलला त्याच वेळी तिकडे दिल्लीत एनडीएने ३८ पक्ष जमवून आपण २६ पक्षांच्या ‘इंडिया' कडबोळ्यापेक्षा अधिक ताकदवान आहोत, हे दाखवून दिले.NDA vs INDIA
 
 

NDA vs INDIA 
 
 
खरे तर काही वर्षे एनडीए नावाची गोष्ट कार्यरत नव्हती. त्यांचे अस्तित्व कागदावर होते. कारण भाजपला स्वबळावर ३०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि मग मित्रपक्ष कारणपरत्वे गळून पडले. असो... तूर्तास शक्तिप्रदर्शनाची पहिली फेरी भाजपप्रणीत एनडीएने जिंकली हे मान्य केले, तरी या वेळची विरोधी पक्षांची मोट ‘इंडिया' या नव्या ओळखीसकट ताकदीने उभी राहात आहे. आपण एनडीए आणि इंडिया याची तुलना पाहू या. NDA vs INDIA आज एनडीएमध्ये असलेल्यांच्या मतांची टक्केवारी २०१९ च्या लोकसभेत ७ टक्के इतकी होती आणि भाजपला ३७.७ टक्के इतके मतदान झाले होते. दोघांना मिळून ४५ टक्के मतदान आणि ३२९ जागा ही आजची स्थिती आहे तर काँग्रेसप्रणीत इंडियाकडे १५७ जागा आहेत. आता एनडीएमधील घटक पक्षांचे विश्लेषण करू या. भाजपच्या एकखांबी सामर्थ्यावर एनडीएचा डोलारा आहे. कारण भाजपच्या ३०३ जागांनंतर दुसरा मोठा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. त्यांच्याकडे १३ जागा आहेत. ३८ पैकी १६ पक्षांनी २०१९ मध्ये एकही जागा मिळवली नव्हती तर नऊ पक्षांनी मागची लोकसभा निवडणूकच लढवली नव्हती.
 
 
‘इंडिया' गटाची परिस्थिती फार वेगळी नाही. त्यांच्या एकूण मतांची टक्केवारी ३८.७ इतकी आहे आणि ११ राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे. त्यात लोकसभेच्या २४३ जागा आहेत. १२ राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून तिथे लोकसभेच्या २१९ जागा आहेत. इंडिया गटाचे यश काँग्रेसच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष सध्या कोणाही बरोबर नाहीत. उत्तरप्रदेशमध्ये मायावती आपला दलित जनाधार गमावत आहेत. NDA vs INDIA आंध्र-तेलंगणामध्ये वायएसआर रेड्डी लोकसभा आणि विधानसभेला आपली दादागिरी टिकवून आहेत. के. सी. राव यांचा बीआरएस पक्ष आता महाराष्ट्रातदेखील आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यांचे शत्रुत्व काँग्रेसशी आहे. तीच बाब तेलगू देसम पक्षाची. काँग्रेस आणि ‘आप'मुळे पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल संत्रस्त असून कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरचा सामना काँग्रेस पळवत असलेल्या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात आहे. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध काँग्रेस विरुद्ध डावे असा लढा आहे तर केरळमध्ये काँग्रेस आणि डावे एकमेकांविरुद्ध तलवारी परजून तयार आहेत.
 
 
NDA vs INDIA आजघडीला एकेका परिवाराची मालकी असलेले देशातले बहुसंख्य प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना वेठीला धरत आहेत. हे जेवढे सत्य तेवढेच या कौटुंबिक प्रादेशिक पक्षांसमोर स्वत:च्या अस्तित्वाचे, कालसंदर्भतेचे आणि उत्तराधिकारी निवडण्याचे जटिल प्रश्न उभे ठाकले आहेत, हेही खरे. एकीकडे सर्वशक्तिमान मोदी तर दुसरीकडे अंतर्गत विरोधात संत्रस्त कौटुंबिक कलहात पछाडलेले विरोधक असा २०२४ चा सामना आहे. आपण महाराष्ट्रात शिवसेनेच्या विचार आणि वारसा हक्काचे युद्ध गेल्या वर्षभरामध्ये अनुभवले. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा वारस कोण आणि युपीमध्ये मायावतींचा बहुजन समाज पक्ष कोण चालवणार, असे प्रश्न आता समोर येत आहेत. कारण त्यांचे रक्ताचे वारस असे कोणी नाही. हे कौटुंबिक पक्ष एखाद्या हिंदू एकत्र कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे तिथे वारश्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. देशात नातेवाईकांंचा गोतावळा अनेक पक्ष चालवतात. त्यात पुतण्या, सून, भाऊ-बहीण, जावई अशी अनेक पात्रे प्रत्येक पक्षात आहेत. NDA vs INDIA त्यामुळे संघर्ष बाहेर नाही तर आतच आहे. दुसरे म्हणजे ज्या कारणापोटी आणि ध्येयासाठी हे पक्ष निघालेत, ते सगळे आदर्श केव्हाच विरून गेले आहेत.
 
 
संस्थापक वृद्ध व्हायला लागला की प्रादेशिक अस्मिता, हिंदुत्व, जात मंडल विरोध, विशिष्ट वर्ग, कामगार वगैरे सर्व आदर्श गळून पडतात आणि कुटुंब कलह केंद्रस्थानी येतो. लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी आणि टीएमसीमध्ये एका पिढीतून दुस-या पिढीकडे थोड्याशा कुरघोडीनंतर हस्तांतरण पार पडले. तीच गोष्ट कर्नाटकमधील जनता दल सेक्युलरची. समाजवादी पक्षात शस्त्रे परजली गेली तर एनसीपी आणि शिवसेनेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. आदर्शांच्या लढाईचे रूपांतर गृहयुद्धात झाले. हे असे का व्हावे? तपशिलामध्ये जाऊन तपासणी केल्यास यामागे अनेक कारणे आहेत, हे लक्षात येते. आपल्याकडे प्रादेशिक पक्षांच्या व्होट बँक तयार झाल्या अन् निर्णय प्रक्रिया कोणाच्या हातात असावी, यावरून वाद सुरू झाले. साधारणपणे असे दिसते की, जात, पात, प्रादेशिक अस्मिता असा झेंडा घेतलेले पक्ष हमखास फुटतात. NDA vs INDIA संस्थापकाने सत्ता कोणाकडे असावी याचा कौल वेळीच न दिल्यास प्रत्येक पक्षात नवनिर्माणाचे वारे वाहू लागतात. तसे पाहिल्यास प्रादेशिक अस्मिता, जात-पात याचे आकर्षण लोहचुंबकासारखे असते. हे ओळखून भाजपने निवडणूक राष्ट्रीय आणि विकासाच्या मुद्यांवर नेली.
 
 
उदाहरणार्थ राम मंदिर, कलम ३७७ अथवा आताचा समान नागरी कायदा. या रेट्यापुढे प्रादेशिक पक्ष कालबाह्य ठरू लागले. त्यात जातिपातीची समीकरणे झपाट्याने बदलत केली. मग या पक्षांना अस्तित्वासाठी नव्या जुळण्या कराव्या लागल्या. तूर्तास या जुळणीचे नवे नाव आहे ‘इंडिया' ! या पुढील काळात कौटुंबिक प्रादेशिक पक्ष हे अस्तित्वासाठी संघर्ष करतील तर ‘आप' किंवा ‘जेडीयू' यांच्यासारखे पक्ष आपली राजकीय ओळख टिकवण्यासाठी धडपडताना दिसतील. NDA vs INDIA अर्थातच भाजपने आपला मोर्चा या कौटुंबिक प्रादेशिक पक्षांकडे प्राधान्याने वळवलेला दिसतो. मायावती, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या पीछाडीमधून असे काही मुद्दे दिसतात. या सर्व पक्षांना संस्थापकांच्या मृत्यूनंतर अस्तित्वच उरणार नाही. काहीही म्हटले तरी त्यांना या शोकांतिकेला सामोरे जावे लागणार आहे. या पक्षांमध्ये योग्य उत्तराधिकारी निवडण्याची सर्वमान्य अशी कोणतीही प्रक्रिया आज तरी दिसत नाही. त्यांच्या कारभारात मूळ विचाराच्या आणि जनतेच्या आकांक्षा दिसत नाहीत.
 
 
भाजपमध्येदेखील येडीयुरप्पा आणि राजस्थानमध्ये सिंधिया यांच्या वारसा-उत्तराधिका-यांचे प्रश्न निर्माण झालेच आहेत. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस एका कुटुंबाला बांधील असल्यामुळे उत्तराधिका-याचा प्रश्न पक्षाचे अस्तित्व संपवतो की काय, अशी भीती आहे. यातूनच राजकीय सरमिसळ आणि आदर्शांची पुनर्मांडणी होते आणि त्यातून हेमंत बिस्वा सर्मा भगवी वस्त्र परिधान करताना दिसतात. प्रदेश आम्ही सांभाळतो तुम्ही देश सांभाळा हे ठाकरे, वाजपेयी काळातील सूत्र आता चालताना दिसत नाही. या पुढच्या काळात हे कौटुंबिक पक्ष लयाला जातील अथवा विलीन होतील हे सूर्यप्रकाशाइतके लख्ख आहे. NDA vs INDIA अशा वेळी जाणवणारे एक तथ्य हे की चांगला पक्ष त्यालाच म्हणावे, ज्यात उत्तराधिकारी निवडण्याची सर्वमान्य प्रक्रिया अस्तित्वात असते. नेतृत्वाचे मोजमाप उत्तराधिका-याच्या क्षमतेवर व्हायला हवे; त्याच्या परिवाराच्या किंवा रक्ताचा नातलग असण्यावर नाही. त्याचप्रमाणे पक्ष कोणाच्या ताब्यात द्यायचा आणि कोणाच्या ताब्यात द्यायचा नाही, याबद्दल भान बाळगणेही महत्त्वाचे असते.
Powered By Sangraha 9.0