तालुक्यात शुक‘वारला पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने Kinhala Zilla Parishad School किन्हाळा जिल्हा परिषद शाळेचा परिसर जलमय झाला. या शाळेला पाण्याने वेढा दिल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या मदतीने शाळा परिसरातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तहसीलदारांनी किन्हाळा गावाला भेट देऊन गावातील परिस्थितीची पाहणी केली.
Kinhala Zilla Parishad School किन्हाळा येथील शाळा परिसर व गावातील साचलेले पाणी बाहेर काढण्याकरिता किन्हाळाचे सरपंच शुभम भोयर, उपसरपंच प्रशांत भोयर, धीरज डांगाले, भास्कर कपाळकर, प्रवीण देठे, विशाल सोमटकर, अनंत काथवटे, सतीश धोटे, प्रवीण काकडे, राजू शास्त्रकार, पुष्पराज गाणफाडे, अनंत आसेकर, राहुल गाणफाडे, गुणवंत येरमे, नितेश भोयर व ग‘ामस्थांनी सहकार्य केले.