तभा वृत्तसेवा
अमरावती,
Saurabh Katiyar जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची राज्य शासनाने बदली केली असून त्यांच्या जागेवर नवे जिल्हाधिकारी म्हणून सौरभ कटीयार यांची नियुक्ती केली आहे. हा बदल शुक्रवारी सांयकाळी जाहीर झाला.पवनीत कौर गेल्या पावणेदोन वर्षापासून अमरावतीत जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याजागेवर नियुक्त करण्यात आलेले सौरभ कटीयार अकोला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
पनवनीत यांची बदली पुणे येथील जीएसडीएच्या संचालक म्हणून करण्यात आली आहे. कटीयार लवकरच पदाची सुत्रे स्विकारतील अशी माहिती प्राप्त झाली आहे. Saurabh Katiyar याशिवाय शासनाने धारणी येथील आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांची सुद्धा बदली केली असून त्यांना नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर नव्या अधिकार्याची नियुक्त करण्यात आलेली नाही.