नागपूर,
भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहर अध्यक्ष बंटी कुकडे (Bunty Kukde) यांचा विदर्भ युवा संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना बंटी कुकडे यांनी पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा संकल्प व्यक्त केला. माजी नगरसेवक प्रा. मधु घाटे, माजी सभापती राजू नागुलवार, विदर्भ युवा संघाचे अध्यक्ष किशोर करांगळे, प्रदीप कदम, वैशाली काळे, विलास कदम, विनायक सवई व कार्यकर्त मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
बंटी कुकडे यांचे पदग्रहण
भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर अध्यक्ष बंटी कुकडे (Bunty Kukde) हे उद्या रविवारी दुपारी 3 वाजता गणेशपेठेतील भाजपा महानगर कार्यालयात पदभार स्वीकारतील. वर्तमान अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी व शहरातील इतर पदाधिकारी उपस्थित राहतील.