कोळसा घोटाळ्याप्रकरणी दर्डा पितापुत्रांना चार वर्षांची शिक्षा

26 Jul 2023 15:44:49
नवी दिल्ली,
Vijay Darda छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने बुधवारी विजय दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Vijay Darda 
याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक केएस क्रोफा आणि केसी समरिया यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. Vijay Darda न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम १२०बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मनोज कुमार जैस्वाल यांना 15 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांना 3 वर्षांच्या शिक्षेसह 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
 
Powered By Sangraha 9.0