गडचिरोली,
CEO Ayushi Singh जिल्हा परिषद गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुषी सिंग या रुजू झाल्या आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडून सदिच्छा घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी जिल्ह्यातील कर्मचारी संघटना आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत सदैव प्रशासनासोबत राहील असा विश्वास संघटनेकडून देण्यात आला.

CEO Ayushi Singh सिंग यांनी जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच सर्व संघटनांची बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, नागपूर विभागाचे विभागीय संघटक साई कोंडावार, जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, सरचिटणीस दूधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, ग्रामसेवक युनियमचे जिल्हाध्यक्ष कवीश्वर बनपूरकर, राज्य कार्याध्यक्ष तथा सरचिटणीस दामोधर पटले, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, मोनाक्षी डोहे, लीना जांभुळकर, पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष कराडे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुखीराम कस्तुरे, जिल्हा परिषद लिपिक संघटनेचे सचिव फिरोज लांजेवार, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, मुख्यालीन शाखेचे अध्यक्ष धनंजय दुम्पटीवार, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, सचिव विनोद सोनकुसरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगला बिरणवार, जिल्हा परिषद महिला समितीच्या सचिव कविता साळवे, नर्सेस संघटनेच्या माजी अध्यक्षा माया सिरसाट, जिल्हाध्यक्षा निलूताई वानखेडे, आशा कोकोडे, चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन ठाकरे, सचिव राजू रेचणकर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.