कोसारा पूल अजूनही पाण्याखालीच

    दिनांक :28-Jul-2023
Total Views |
- यवतमाळ-चंद्रपूर वाहतूक बंदच

मारेगाव, 
मागील आठ दिवसांपासून सततच्या अतिवृष्टीने मारेगाव तालुक्यातील नदी तसेच नाल्यांना पूर आला आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असून मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क तुटलेला आहे. जुलैच्या शेवटी पावसाने कहरच केलेला आहे. सततधार पावसाने तालुक्याची वरदायिनी वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा Kosara Bridge कोसारा येथील पूल मागील दोन दिवसांपासून बंद आहे. शुक‘वार, 28 जुलै रोजीही कोसारा येथील पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत होते. तसेच मार्डी येथील वर्धा धरणही ओसंडून वाहत आहे. पुलावरून सात ते आठ फूट पाणी वाहत असल्याने हा पूलही तीन दिवसांपासून बंद आहे.
 
 
Kosara Bridge
 
Kosara Bridge नदीकाठावरील शेती पाण्याखाली असून शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळाच्या जखमा ओल्या असतानाच यावर्षीही पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असल्याचे चित्र तालुक्यामध्ये आहे. नालेही भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून सर्वच नाले हे भरभरून वाहत आहेत. नाल्यांनी आपली पातळी ओलांडल्याने गावागावांचा संपर्क तुटला होता. वनोजादेवी येथील नाला सात ते आठ फूट वरून वाहत होता. दापोरा येथील नाल्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे चिंचमंडळ परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. मार्डी, वेगावचा नाला, नांदेपेरा, दांडगाव, सिंधी, कोथुरला, बोरी (गदाजी), मदनापूर, धामणी, बुरांडा, हटवांजरी असे तालुक्यातील सर्वच गावातील नाले ओसंडून वाहत होते.
 
 
मार्डी येथे दोघे वाहून जाताजाता वाचले. मार्डी येथील चोपण रस्त्यावर असलेल्या आणि मार्डीला लागूनच असलेल्या नाल्याने विक्राळ रूप धारण केले. आजवरच्या इतिहासात हा नाला एवढा कधीच वाहिला नव्हता असे वयोवृद्ध छातीठोकपणे सांगताना दिसले. या नाल्यामधून रस्ता पार करताना अतिउत्साही असलेल्या दोघांचा तोल गेला. परंतु सुदैवाने समोरच असलेल्या दुकानासाठी उभ्या केलेल्या लोखंडी अँगलने त्यांचा जीव वाचवला.
तहसीलदारांची ठिकठिकाणी पाहणी
मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पूरग्रस्त तसेच पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यात कोसारा, दापोरा, सावंगी, मार्डी आदी भागांचा समावेश आहे. अनेक गावांना पाण्याचा वेढा तालुक्यातील सावंगी, शिवणी, वनोजादेवी, बामर्डा या गावांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र निर्माण झाले होते.