लक्ष्य सेन उपांत्य फेरीत

28 Jul 2023 19:40:28
- जपान ओपन बॅडमिंटन
- सात्त्विक-चिराग बाहेर

टोकियो, 
भारताच्या Lakshya Sen लक्ष्य सेनने आपली प्रभावी विजयीघोडदौड कायम राखत येथे जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. लक्ष्यने जपानच्या कोकी वातानाबेवर सरळ गेममध्ये विजय मिळवला. 2021 च्या विश्व स्पर्धेतील कांस्यपदक विजेता व विश्व क‘मवारीत 13 व्या क‘मांकावर असलेल्या लक्ष्य सेनने 33 व्या क‘मांकावर असलेल्या वातानाबेवर 21-15, 21-19 असा विजय मिळवून सलग तिसरी उपांत्य फेरी गाठली. आता अल्मोराचा 21 वर्षीय विद्यमान राष्ट्रकुल विजेता लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टी किंवा थायलंडचा तिसरा मानांकित कुनलावुत विटिडसर्नशी खेळेल.
 
 
LAKSHYA-SEN
 
सात्त्विकसाईराज रन्कीरेड्डी व चिराग शेट्टी या फॉर्ममध्ये असलेल्या पुरुष दुहेरीच्या जोडीला मात्र आपला अ दर्जाचा खेळ दाखवता आला नाही आणि या भारतीय जोडीला ऑलिम्पिक विजेते ली यांग व वांग ची-लान या चीन तैपेईच्या जोडीकडून 15-21, 25-23, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. 
 
 
या महिन्याच्या प्रारंभी कॅनडा ओपन सुपर 500 स्पर्धा जिंकणार्‍या लक्ष्य सेनने शैलीदार खेळ करीत ब्रेकपर्यंंत 5-3 पुढे 11-7 अशी आघाडी घेतली. पुढे भारतीयांनी जपानविरुद्ध जोरदार क‘ॉस फटके परतावून लावत पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेमच्या प्रारंभी वातानाबेने रॅलीमध्ये थोडा वेग टोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सेनने सुंदर क‘ॉस फटके मारीत सामन्यावर आपले नियंत्रण राखले. वातानाबेनेही काही उत्तम बचाव करीत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु Lakshya Sen लक्ष्य सेनने त्याचे मनसुबे उधळीत दुसर्‍या गेमसह सामना जिंकला.
Powered By Sangraha 9.0