विरोधकांच्या घोषणाबाजीत तीन महत्त्वपूर्ण विधेयके पारित

28 Jul 2023 20:44:09
नवी दिल्ली, 
Lok Sabha Bill लोकसभेत आज गोंधळात खाण आणि खनिज (दुरुस्ती आणि नियमन) विधेयक, नॅशनल नर्सिंग अ‍ॅण्ड मिडवाईफ कमिशन विधेयक आणि दंत चिकित्सा आयोग विधेयक अशी तीन विधेयक पारित करण्यात आली. नंतर सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले. आज सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी सदस्यांनी मणिपूरच्या मुद्यावर घोषणाबाजी केली. या गोंधळातच पिठासीन सभापती राजेंद्र अग्रवाल यांनी कागदपत्र पटलावर सादर करवून घेतली.
 
 
Lok Sabha Bill
 
Lok Sabha Bill खाण आणि खनिज (दुरुस्ती आणि नियमन) विधेयक खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडले. त्यावर झालेल्या अल्प चर्चेला उत्तर देताना जोशी यांनी हे अतिशय महत्त्वपूर्ण विधेयक आहे. या विधेयकामुळे ऊर्जा क्षेत्रात आपण आत्मनिर्भर होणार असल्याचे सांगितले. आधी आपल्या देशाला कोळशाच्या आयातीवर अवलंबून राहावे लागत होते, आता देशातील कोळशाचे उत्पादन वाढल्यामुळे या क्षेत्रात आपण आत्मनिर्भर झालो आहे. खनिजाच्या महसुलातही मोठी वाढ झाली, असे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वात देशातील खाण आणि खनिज क्षेत्रात जे मोठे बदल झाले, त्यामुळे 2025-26 पर्यंत आपल्यावर कोळशाची आयात करण्याची वेळ येणार नाही, असे ते म्हणाले. नंतर आवाजी मतदानाने हे विधेयक पारित करण्यात आले.
 
 
नॅशनल नर्सिंग अ‍ॅण्ड मिडवाईफ कमिशन आणि राष्ट्रीय दंत चिकित्सा आयोग अशी Lok Sabha Bill दोन विधेयके आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी मांडली. नॅशनल नर्सिंग अ‍ॅण्ड मिडवाईफ कमिशन विधेयकात राष्ट्रीय नर्सिग आणि मिडवाईफरी आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. या आयोगात 29 सदस्य राहतील. नर्सिग आणि मिडवाईफरी शिक्षणाबाबतचे धोरण तयार करण्याचा तसेच या क्षेत्रातील मापदंड निश्चित करण्याचा अधिकार या आयोगाला असेल, असे मंडाविया म्हणाले. नंतर हे विधेयकही आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. 
 
 
दंत चिकित्सा आयोग विधेयकही नंतर आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. गुणवत्तापूर्ण आणि किफायती दंत चिकित्सा शिक्षण तसेच त्याचे उपचार कसे उपलब्ध करुन देता येईल, याचा विचार हा आयोग करणार आहे, असे मंडाविया यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0