युक्रेनच्या ओल्गा खर्लानची रशियाच्या स्मिर्नोव्हावर मात

    दिनांक :28-Jul-2023
Total Views |
मियामी :
येथे आयोजित जागतिक फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ महिलांच्या सायबर वैयक्तिक प्रकारात युक्रेनच्या Olga Kharlan ओल्गा खार्लानने तटस्थ खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी झलेल्या रशियाच्या अ‍ॅना स्मिर्नोव्हावर विजय नोंदविला. गत वर्षी रशियाच्या आक‘मणानंतर ओल्गा खार्लान युक्रेनचे प्रतिनिधित्व करणारी पहिली खेळाडू ठरली.
 
 
OLGA
 
युक्रेनच्या क्रीडा मंत्रालयाने सादर केलेल्या नवीन धोरणानुसार युक्रेनच्या खेळाडूंना रशिया व बेलारूसचे प्रतिनिधीत्व करणार्‍या खेळाडूंविरुद्ध खेळण्यास मज्जाव केला आहे. मात्र या स्पर्धेत स्मिर्नोव्हा एक तटस्थ खेळाडू म्हणून खेळत होती. चार वेळची विश्व सायबर विजेती Olga Kharlan ओल्गा खार्लानने स्मिर्नोव्हावर मात केली व पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या वचनाची पूर्तता केली. 32 वर्षीय ओल्गाने सामना जिंकला, मात्र रशियाच्या खेळाडूशी हस्तांदोलन करण्याचे टाळले. ओल्गा टोकियो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा आहे.