तभा वृत्तसेवा
देवरी,
Amgaon-Devari मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सहसराम कोरोटे यांनी आमगावःदेवरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते, पूल, दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणासाठी मिळणार्या विद्यावेतनात वाढ, आमगाव नगरपरिषदेची निवडणूक, आदिवासींना वनहक्क कायद्याचा लाभ, पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेत मतदानाचा अधिकार आणि भत्त्यात आदि विविध विषयांवर प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले.
तालुक्यातील चिलमटोला गावातून पालांदूरकडे जाण्यासाठी 7 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. या मार्गावरून चुंबी नावाची नदी वाहते. नदीवर पूल नाही. त्यामुळे रस्ता ओलांडताना आतापर्यंत सात लोकांना जीव गमवावा लागला आहे. क्षेत्र आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त आहे. येथे प्राथमिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. Amgaon-Devari आज समाजामध्ये एमपीएससी व यूपीएससी अभ्यासक‘माकरिता आदिवासी मुलामुलींना तयार करून ते मोठे अधिकारी बनले पाहिजेत, यासाठी निधीची गरज आहे. 2017 मध्ये आमगाव येथे नगर परिषदेची स्थापना झाली. पण आतापर्यंत या ठिकाणी निवडणूकच लागलेली नाही. या नगर पारिषदेत ज्या आठ गावांचा समवेश करण्यात आला आहे. त्या आठ गावातील लोकांना नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामविकासाच्या असो किंवा नगरविकासाच्या सुविधा आमगाव नगरपरिषदेच्या रहिवाशांना मिळत नाही. या नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकासाची कामे होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.