नागपूर,
sewage leakage अमरावती रोडवरील भरत नगर येथील रस्त्यांवर नियमितपणे गडरची घाण वाहत आहे. पावसाच्या पाण्याने ती घाण सगळीकडे पसरते आहे. sewage leakage त्यामुळे भरत नगरातील नागरिकांचे रस्त्यावर निघणे अवघड झाले आहे. कोणत्याही प्रकारे पायदळ व्यक्ती भरत नगरात फिरू शकत नाही.
सकाळी मॉर्निंग वॉक करणारे तसेच दत्त मंदिर भरत नगर येथे येणाऱ्या भाविकांना पायदळ चालताना गडरच्या घाणीतून वाट काढत चालावे लागते. sewage leakage त्यातच रस्त्याने जाणाऱ्या गाड्या वाहणारे पाणी पादचरांच्या अंगावर उडवून त्यांना आंघोळ घालत आहेत. यात प्रशासन शांतपणे बघत आहे पण कुठल्याही प्रकारची कारवाही त्यावर होताना दिसत नाही. sewage leakage
सौजन्य : लीलाधर अढाऊ, संपर्क मित्र