पणन कार्यालयात शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

34 शेतकर्‍यांना दीड महिन्यापासून धान विक्रीचा मोबदलाच नाही

    दिनांक :29-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
शासकीय धान विक्री केंद्रावर धान विक्री करून दीड महिन्याचा कालावधी लोटूनही रक्कम मिळाली नसल्याने व वारंवार जिल्हा पणन कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही farmer self-immolation अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍याने जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्या कक्षात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच सोबत असलेल्या शेतकर्‍यांनी प्रसंगावधान साधत हा अनुचित प्रकार थांबविला.
 
farmer self-immolation
 
गोंदिया तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव धान खरेदी संस्थेला शासकीय धान खरेदी करण्याची परवानगी जिल्हा पणन कार्यालयाने दिली. या केंद्रावर चुटियासह परिसरातील शेतकर्‍यांनी जून महिन्यात farmer self-immolation उन्हाळी हंगामातील शेकडो क्विंटल धान विक्री केले. विक्री केलेल्या धानाची रक्कम आठवडाभरात शेतकर्‍यांच्या बँक खत्यात जमा होणे अपेक्षित होते. मात्र महिना लोटूनही रक्कम जमा झाली नसल्याने प्रथम शेतकर्‍यांनी केंद्रावर जाऊन चौकशी केली असता जिल्हा पणन कार्यालयातून रक्कम थांबविण्यात आल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात आले. यानंतर शेतकर्‍यांनी गोदिया येथील जिल्हा पणन कार्यालय गाठून धान रकमेसंदर्भात जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांना विचारणा केली असता संस्थेने खरेदी केलेला धान गोदामात उपलब्ध नसल्याने रक्कम थांबविण्यात आल्याचे सांगीतले. जिल्हा प्रशासनाने नियमाने संस्थेवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र शेतकर्‍यांची चूक नसताना विनाकारण शेतकर्‍यांची अडवणूक केली. श्रीराम अभिनव संस्थेत 16 हजार 500 क्विंटल धान उपलब्ध नाही.
 
 
या केंद्रावर धान विक्री करणार्‍या 34 शेतकर्‍यांचे लाखो रुपये अडवून ठेवण्यात आले आहे. farmer self-immolation शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे न्यायाची हाक लावली. मात्र त्याच्या कष्टाचा पैसा त्यांना मिळाला नाही. खरीपाची लागवड केली. मजूरी, ट्रॅक्टर भाडा, खते, बियाणे, किटकनाशके यांची रक्कम देणे असल्याने शुक्रवार, 28 जुलै रोजी काही शेतकर्‍यांनी जिल्हा पणन अधिकारी यांचे कक्ष गाठले. त्यांना रकमेसंदर्भात विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून शेतकर्‍यांचे समाधान झाले नाही. दरम्यान लोधीटोला येथील संतप्त शेतकरी दीपक कंसरे यांनी सोबत आणलेल्या पिशवीतूनन पेट्रोल भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र खुर्चीवर बसलेले जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे खुर्चीवरून हलले सुद्धा नाही. सोबत असलेल्या शेतकर्‍यांनी प्रसंगावधान साधल्याने अनर्थ टळला.
 
 
अन्यथा आंदोलन
श्रीराम अभिनव धान खरेदी संस्थेने आपली संपत्ती विक्री करून चार दिवसांत धान उपलब्ध करून देत असल्याचे लेटर हेडवर लिहून दिले आहे. चार दिवसानंतर पैसे मिळाले नाही तर मोठे आंदोलन करणार असल्याचे शेतकरी तुलाराम बघेले यांनी सांगीतले.
 
 
चुटीया येथील श्रीराम अभिनव संस्थेने खरेदी केलेला धान केंद्रावर उपलब्ध नसल्याने व मिलर्सला धानाची उचल न दिल्यामुळे संस्थेअंतर्गत धान विक्री केलेल्या शेतकर्‍यांचे चुकारे प्रलंबित आहेत. त्यासाठी farmer self-immolation प्रधान कार्यालयाकडे माहिती पाठविलेली होती, संबंधित केंद्रावर धान विक्री केलेले शेतकरी चुकारे मिळावे म्हणून माझ्या कक्षात आले. पैकी एका युवा शेतकर्‍याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. सर्व शेतकर्‍यांची समजूत काढली. शेतकर्‍यांचे सातबारा उतारे, आधारकार्ड, ऑनलाईन फोटो आदी तपासून चुकारे अदा करण्याबाबत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी पाठविले आहे, मंजूरी मिळताच चुकारे अदा करण्यात येणार असल्याचे विवेक इंगळे यांनी सांगीतले.