नागपूर,
Medical square Nagpur नागपूर शहरातील मेडिकल चौक हा वर्दळीचा भाग असून, येथून आपली बसमार्फत ५ ते ६ ठिकाणांसाठी सेवा दिली जाते. या बसथांब्यावर दिवसभर कामय गर्दी असते.
प्रवासी येथे बसची वाट पहात थांबलेले असतात. सवारी रिक्षामध्ये असलेली दाटीवाटी, त्यामुळे बरोबर आजारी माणसाला न्यायचे असल्यास बस हा एकच पर्याय असतो. Medical square Nagpur पण इथे बसशेड नसल्याने, उन्हाळा, पावसाळा याची झळ येथील प्रत्येक प्रवाशाला सोसावी लागते. मेडिकलमध्ये उपचार घेण्यासाठी खूप दूरून लोक नेहमी येत असतात. Medical square Nagpur कृपया या समस्येची नोंद घेऊन यावर मार्ग काढवा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
सौजन्य : डॉ. प्रवीण देशमुख, संपर्क मित्र