अपात्रेवर योग्य निर्णय घेऊ

03 Jul 2023 17:54:14
- राहुल नार्वेकर यांची माहिती
 
मुंबई, 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये रविवारी मंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार आणि अन्य आठ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशा विनंतीचे पत्र आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळाले असून, त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष Rahul Narvekar अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी अजित पवार आणि अन्य आठ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका विधानसभाध्यक्षांकडे सादर केली होती. सोबतच, पाटील यांनी एक ई-मेल निवडणूक आयोगालाही पाठविला होता.
 
 
Rahul Narvekar
 
यावर पत्रकारांनी विचारले असता, Rahul Narvekar नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांची याचिका मला प्राप्त झाली आहे आणि मी ती काळजीपूर्वक वाचली आहे. त्यात नमूद असलेल्या मुद्यांवर मी अभ्यास करणार आहे आणि लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या किती आमदारांचा पाठिंबा आहे, असे विचारले असता, याबाबतची माहिती मला नाही, असे उत्तर नार्वेकर यांनी दिले. रविवारच्या घडामोडींमुळे राज्य विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. त्यामुळे नवा विरोधी पक्षनेता निवडण्याची कार्यवाही मला लवकरच पूर्ण करावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0