सिकलसेल रुग्णांनी खचून जाऊ नये : आ. नामदेव ससाने

    दिनांक :03-Jul-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
सिकलसेल हा आजार प्रत्येक कुटुंबात राहत नाही. (MLA Namdev Sasane) हा आजार अनुवंशीक आजार असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातून राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन अभियान शुभारंभ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशात करण्यात आला. याबाबत जनजागृती करण्याबाबत शासन विनामुल्य सेवा देते तसेच दिड हजार रुपयापर्यंत मदत करते. त्यामुळे सिकलसेल आजार जडलेल्या रुग्णांनी खचून जावू नये महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन आमदार नामदेव ससाने यांनी केले.
 
MLA Namdev Sasane
 
स्थानीक उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन अभियान शुभारंभ कार्यक्रमात (MLA Namdev Sasane) आमदार ससाने बोलत होते. 1 जुलै रोजी महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशावरून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी ससाने म्हणाले, सरकारने सिकलसेल रुग्णांना वार्‍यावर सोडले नाही त्यांना 5 लाखाचे रुग्णालयातील उपचारासाठी कवच दिले आहे. सिकलसेल रुग्णांना रक्ताची गरज भासते ती त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून तालूका स्तरावर लवकर रक्त पुरवठा करणारी लॅब उपलब्ध करून देवू, असे आश्वासन देवून ससाने यांनी या आजारावर आशा वर्कर यांनी ग्रामीण भागात जनजागृती करावी असे आवाहन केले.
 
 
यावेळी (MLA Namdev Sasane) भाजपाचे माजी शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, वैद्यकिय अधीक्षक डॉ. रमेश मांडन, डॉ. किशोर कपाळे, भताने, विकास गोविंदपुरे, ज्योती मगर, घुगे, वैशाली धोंगडे, साखरे उपस्थित होते. संचलन वैशाली धोंगडे यांनी तर आभार सुरेश मुनेश्वर यांनी मानले.