विधानसभा इमारत लोकशाहीचे मंदिर

30 Jul 2023 14:46:57
दिसपूर, 
Assam Legislative Assembly : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. बिर्ला यांच्या व्यतिरिक्त आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजित दामरी, मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि रामेश्वर तेली यांच्यासह इतर मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

Assam Legislative Assembly
 
आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन (Assam Legislative Assembly) समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, कोणत्याही राज्याच्या विधानसभेची इमारत ही केवळ इमारत नसते. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. या मंदिरात बसून आम्ही लोकांच्या कल्याणासाठीच काम करतो. त्यामुळेच लोकशाहीच्या 75 वर्षांच्या प्रवासात आपण सामाजिक-आर्थिक विकासाच्या माध्यमातून देशाला पुढे नेले आहे.
 
 
अधिका-यांनी सांगितले की, नवीन विधानसभा संकुल दहा एकर जागेवर पसरले आहे, ज्यात मुख्य इमारत आणि प्रशासकीय कामासाठी इतर इमारतींचा समावेश आहे. आसामच्या नवीन विधानसभेत एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत. (Assam Legislative Assembly) यासोबतच आमदारांना बसण्यासाठी आधुनिक विद्युत रोषणाई, आलिशान खुर्ची आणि आसनव्यवस्था करण्यात आली आहे. नवीन कॅम्पसची पायाभरणी 10 वर्षांपूर्वी झाली होती आणि त्यानंतर त्याच्या बांधकामासाठी 234.84 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, मात्र कॅम्पसमधील बांधकाम आणि इतर बांधकामांना झालेल्या दिरंगाईमुळे आता 351 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0