जिल्ह्यातील 545 ग्रापंची माती जाणार दिल्लीला

30 Jul 2023 19:55:54
तभा वृत्तसेवा
गोंदिया, 
Meri Mitti Mera Desh आझादी का महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 545 ग्रामपंचायतीमध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अिायान राबविण्यात येणार आहे. यातंर्गत 15 ऑगस्टपूर्वी जिल्ह्यातील 545 ग्रामपंचायतींसह पाच नगर पंचायत व तीन नगर परिषद परिसरातील माती दिल्ली येथे साकारण्यात येत असलेल्या अमृत वाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे.
 
 
Meri Mitti Mera Desh
 
गावापासून ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी प्रेम, जागृती व साक्षरता निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील गावांमध्ये 9 ऑगस्टपासून अभियान राबविण्यात येणार आहे. Meri Mitti Mera Desh त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान गावातील संस्मरणीय ठिकाणी ‘आझादी का अमृत’ महोत्सव अंकीत असलेल्या शिलाफलकाची उभारणी करणे, गावातील योग्य ठिकाणी वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करणे, देश स्वातंत्र व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या विरांचा सन्मान करणे, हातात दिवे लावून पंचप्राण शपथ घेणे, ध्वजारोहण करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. अभियानातंर्गत तालुक्यातील प्रत्येक गावातील माती गोहा करत तालुकास्तरावर कलश तयार करण्यात येणार असून जिल्ह्यातील आठही तालुक्यातून जिल्हास्तरावर प्राप्त 8 कलश दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.
 
यंत्रणा सज्ज
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाला ऑगस्ट महिन्यात 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येत असून अभियानाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी तथा ग्रामस्तरीय कर्मचार्‍यांनी परिणामकारक नियोजन करुन अभियान यशस्वी केले जाणार असल्याचे जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0