नागपूर,
Gondaraj Bakht Buland Shah देवगढ साम्राज्याचे शक्तिशाली राजे नागपूर महानगरीचे संस्थापक गोंडराजे बख्त बुलंद शहा ऊईके यांच्या जयंतीनिमित्त गोंड राजे बख्त बुलंद शहा यांच्या विधान भवन चौक सिव्हिल लाईन नागपूर येथील त्यांच्या पुतळ्याला गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे माल्यापर्ण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. श्याम कोरेटी (इतिहास विभाग तथा अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) यांनी गोंडराजे बक्त बुलंद शहा यांची ऐतिहासिक माहिती दिली.

कार्यक्रमास गोंडराजे वीरेंद्र शहा, रविंद्र ठाकरे माजी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर. दशरथ कुळमते सहयक आयुक्त आदिवासी विकास विभाग, नितीन इसोकर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूर, कृष्णराव परतेकी माजी उपमहापौर, विजय मसराम भिमाल पेन पालखी संयोजक, सुर्यकांत उईके, दिनेश शेराम, मधुकर उईके, राजेंद्र मरसकोल्हे, विजय कोकोडे, दिनेश सिडाम अध्यक्ष Gondaraj Bakht Buland Shah नागपूर शहर गोंगपा, गंगा टेकाम जिल्हाध्यक्षा नागपूर, विजय आतराम, कृष्णा सरोते, अशोक पोयाम, राम भलावी, मंगेश धुर्वे, उमेश टेकाम, राहुल मसराम, सरस्वती सलामे, वनश्री पंधरे, विजय परतेकी, राहुल मडावी, विनय उईके, स्वप्निल मसराम तसेच समस्त बांधव उपस्थित होते. यावेळी रविंद्र ठाकरेंनी उद्योजकते वळा असे सांगितले व आपला आदिवासींच्या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास करावा, असा सल्ला दिला. दिनेश सिडाम यांनी गोंड राजे बख्त बुलंद शहा उईके यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, यावर भर दिला.
सौजन्य : देवराव प्रधान, संपर्क मित्र