भारताची अंतराळ क्षेत्रात भरारी

31 Jul 2023 18:53:16
वेध
- नितीन शिरसाट
ISRO India सध्याचे युग विज्ञान-तंत्रज्ञान-विकासाचे आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाच्या आविष्कारातून शास्त्रज्ञ, संशोधक, वैज्ञानिक, प्रयोगशील शेतकरी प्रत्यक्ष कृतीतून देशाची प्रगती करण्याचे ध्येय साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ISRO India भारताने स्वातंत्र्यानंतर विज्ञान क्षेत्रात प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. मानवाच्या कल्पना ज्ञानशक्तीच्या आधारे पहिल्यांदा इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती केली. ISRO India समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी व वीज निर्मिती यासह अनेक संशोधन करून संपूर्ण जग संगणक, भ्रमणध्वनी, ई-सेवेच्या माध्यमातून सहज सुलभ सुविधेतून एकवटले गेले आहे.
 
 
 
ISRO India
 
 
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) १५ ऑगस्ट १९६९ मध्ये स्थापन करण्यात आली. याद्वारे उपग्रह अंतराळात सोडण्यात येतात. भारतीय अंतराळ आंध्रप्रदेश येथील श्रीहरिकोटा येथे १९७१ ला स्थापन झालेल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून प्रक्षेपण केले जाते. सध्या याचे प्रमुख एस. सोमनाथ हे आहेत. ISRO India चांद्रयान-१ चे प्रक्षेपण २२ ऑक्टोबर २००८ मध्ये करण्यात आले. त्यानंतर मंगळ ग्रहावर जाण्यासाठी यान प्रक्षेपण ५ नोव्हेंबर २०१३ मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षात गेल्यानंतर २८ सप्टेबर २०१४ ला प्रस्थापित झाले. ‘मॉम' या नावाने प्रसिद्ध झालेले चांद्रयान-२ ची दुसरी मोहीम २२ जुलै २०१९ रोजी राबविण्यात आली. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वहन कृत्रिम उपग्रहांचा उपयोग शेती, पर्यावरण निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, ISRO India पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेण्याचा संदेश वाहन अवकाशातून प्रवास करणा-या वैज्ञानिकांना अंतराळवीर संबोधले जाते.
 
 
पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून राकेश शर्मा यांच्या नावाची नोंद आहे. १९८४ ला ते अवकाशात गेले. आठ दिवस अवकाशात त्यांचे वास्तव्य होते. ISRO India भारताकडे पाहताना ‘सारे जहाँसे अच्छा, हिदोंस्ता हमारा' हा संदेश त्यांनी पाठविला होता. कल्पना चावला नासा (अमेरिका) यांनी अंतराळ संशोधन करताना ३७६ तास ३४ मिनिटे कोलंबिया अंतराळ यानातून प्रवास केला. सुनीता विल्यम्स यांनी सात वेळा प्रवास केला. पृथ्वी आणि चंद्रविश्वाचा अभ्यास करण्यासाठी चंद्र हे वैज्ञानिकासाठी संशोधन केंद्र बनले. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. भारताच्या तीन चांद्रमोहिमा असतील. चंद्रावरील मोहीम व संशोधन सगळ्याच देशांसाठी एक आव्हान मानले जाते. ISRO India अमेरिकेच्या अपोलो ११ मोहिमेदरम्यान १९६९ मध्ये चंद्रावर पाहिले पाऊल ठेवणारा मानव नील आर्मस्ट्राँग होता; या ऐतिहासिक घटनेनंतर कोट्यवधी वर्षांनी चंद्रावरील रहस्य उलगडायला सुरुवात झाली.
 
 
 
भारतातील इस्रोच्या संशोधकांनी यात मोलाची भर घातली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे चांद्रयान-२ चे प्रक्षेपण केल्यानंतर श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून १४ जुलै रोजी चांद्रयान-३ ने यशस्वी उड्डाण घेतले. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे थर्मल शिल्ड हे विदर्भातील खामगाव येथील विक्रमसी फेब्रिकेशनने तयार केले होते. ISRO India देशाच्या या स्वप्नपूर्ती मोहिमेला मिग-२१ ला लढाऊ विमानासाठी लागणारी ताडपत्री तयार करून भारतीय हवाई दलाला पुरविली होती. इस्रोच्या वैज्ञानिकांनी यानाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती देताना सांगितले की, सुस्थितीत असलेले यानाचे कार्य अपेक्षेनुसार सुरू असून ५ ते ६ ऑगस्ट रोजी ते लुनार ऑर्बिट इन्सर्शन कक्षात असेल. त्यावेळी ते पुढील दिशेला ढकलण्यात येईल.
 
 
१७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन सिस्टम लॅडर रोव्हरपासून वेगळे होईल. या मोहिमेचे संचालक पी. वीर मुथुवेल यांनी चांद्रयान-३ ची माहिती देताना २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगसाठी पृथ्वीपासून दूर नेण्यात येईल. ही तांत्रिक स्थिती अतिशय कठीण असून शास्त्रज्ञांच्या परीक्षेचा काळ असेल. त्यावर सूक्ष्म निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ISRO India या अभियानानंतर उपग्रह वाहून नेण्यात सिद्ध ठरलेल्या पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रातून सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून सर्व उपग्रह इच्छित कक्षेत स्थापन करण्यात आले आहेत. अशी ऐतिहासिक अंतराळ भरारी घेताना भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
 
९८८१७१७८२८
Powered By Sangraha 9.0