मानोरा,
तालुक्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या औचित्याने ठिकठिकाणी मानवाला घडविणार्या (Blood Donation Camp) गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिशक्ती जगदंबा देवी, संत शिरोमणी सेवालाल महाराज, महान तपस्वी संत रामराव बापू महाराज यांचे देवस्थान असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी जमली होती. भक्तराज महाराज मित्र मंडळ द्वारा गुरुपौर्णिमेनिमित्त शौर्य ब्लड सेंटर कडून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जो शिकवितो तो गुरु आणि जो आपल्या आयुष्यात सुख समाधानाची पौर्णिमा आणतो तो खरा सद्गृुरु अशी गुरूंची सोपी व्याख्या करता येईल.आज पर्यंत आपल्या आयुष्यात आई वडील आणि गुरूंनी अमूल्य ज्ञान दिले, (Blood Donation Camp) तसेच आपल्यापैकी प्रत्येकाकडून जाणता अजाणताही आपण अनेक गोष्टी शिकलो म्हणून आजच्या गुरुपौर्णिमे च्या पावन दिणी आपण आपल्या गुरूला वंदन करीत असतो. आपल्या जीवनाला आकार देणार्या वंदनीय गुरुवर्यांना छोटीशी गुरुदक्षिणा म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन भक्तराज महाराज यांनी या निमित्त केले. याशिबिरात १०० रक्तदात्यांनी या पवित्र दिनी रक्तदान केल्याची माहिती महाराजांनी यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.