जिल्हा परिषदे शाळेत गुरु पौर्णिमा उत्साहात

04 Jul 2023 18:05:31
तभा वृत्तसेवा
सडक अर्जुनी, 
स्थानिक जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात 3 जुलै रोजी Guru Purnima ‘गुरू पोर्णिमा’ कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक डी. पी. डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला आर. जी. पुस्तोडे, आर. ए. बावनकर, एन. आर. गिर्‍हेपुंजे, पी. सी. येळेकर, यू. आय. खुटमोडे, सी. एम. भिवगडे, व्ही. पी. आगाशे, टी. आर. उपरीकर, आय. वाय. रहांगडाले, आर. एच. डोंगरे, पी. टी. मेंढे, जे. पी. नंदेश्वर, ए. व्ही. केंद्रे, एस. जी. मारबते, आर. जी. निंबेकर उपस्थित होते.
 
Guru Purnima
 
प्रसंगी सावित्रीबाई फुले, सरस्वती माता व ओम, स्वतिकच्या Guru Purnima प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. एन. आर. गिर्‍हेपुंजे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेत लावा, असा संदेश दिला, व्ही. पी. आगाशे यांनी थोर पुरुषांचे विचार अंगीकार करण्याचा संदेश दिला. पी. सी. येळेकर यांनी ‘अनमोल जन्म दिला ग आई तुझं उपकार फिटणार नाही’ हे गीत सादर केले. अक्षरा बागडे या विद्यार्थीनीने ‘गुरुचे महत्त्व’ या विषयावर भाष्य केले. कार्यक्रमाचे संचालन रोहिणी लांजेवार हिने केले. आभार समीक्षा राजेंद्र अंबादे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0