बहुरूपी लोककलावंत झाले दुर्मिळ

    दिनांक :05-Jul-2023
Total Views |
- संजय निंदेकर
झरीजामणी, 
झरीजामनी तालुक्यातील आंबेझरी व केळापूर तालुक्यातील गोपाळपूर येथील (Bahurupi folk artist) लोककलावंत बहुरूपी वेगवेगळ्या वेशभूषा करून गावागावात जाऊन मिळेल ते धान्य कपडे पैसे घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. बदलत्या आधुनिक तंत्रज्ञान काळात बहुरूपी ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असून त्यातील काही बहुरूपी कलावंत आपली कला जिवंत राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
 
Bahurupi folk artist
 
रब्बी हंगामाला सुरुवात झाली की ग्रामीण भागात शहरी भागात जाऊन वेगवेगळ्या (Bahurupi folk artist) वेशभूषा घेऊन जसे वासुदेव, नंदीबैलवाले, कडकलक्ष्मी व बहुरूपी शंकर, पोलिस अशा अनेक वेशांमध्ये ते पूर्वी आपल्याला पाहयला मिळत होते. परंतु जुन्य पिढीतील बहुरूपी वार्धक्यामुळे थकले आणि त्यांनी ही बहुरूपी कला सोडली. पूर्वांच्या काळच्या आठवणी तहसील कार्यालय झरी येथे बहुरूपी यांचे दर्शन झाल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या. केळापूर तालुक्यातील गोपालपूर येथील पांडुरंग लहानू शिंदे शंकराची वेशभूषा करून झरी तहसील कार्यालयासह इतरही कार्यालयांत जाऊन मिळेल ते पैसे घेऊन जात असतात.
 
 
त्यांची एकूणच अवस्था पाहून, चेहर्‍यावरील निराशा पाहून विचारपूस केली असता, (Bahurupi folk artist) लोककलावंतांना कोणतेही मानधन शासनाकडून मिळत नाही. बदलत्या काळामध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा दिसून येत आहे. वंशपरंपरागत व्यवसाय आमची मुले करण्यास तयार नाहीत, असे ते म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही कला, हा व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर असून उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे, असे मत या बहुरूपी कलावंताने तरुण भारत प्रतिनिधीजवळ मांडले.
 
 
बहुरूपी लोककलावंत (Bahurupi folk artist) माणूस उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देव-देवतांचे वर्णन करतात, परंतु हे सारे बदलत्या परिस्थितीमुळे हरवले आहे. काही कला जिवंत असल्या तरी बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचेही महत्व कमी झाले आहे. अलीकडे या बहुरूपी लोककलावंतांचे दर्शन ग्रामीण व शहरी भागातही क्वचितच होत आहे.