तभा वृत्तसेवा
गोंदिया,
Government schemes केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी यंत्रणांनी सामाजिक दृष्टीकोन ठेवून कामे करावीत व गरजू लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावे असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अंमलबजावणी यंत्रणांना दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. Government schemes सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रमिला जाखलेकर यावेळी उपस्थित होते. Government schemes
Government schemes मागील सभेच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल पुरेशा अवधी पूर्वी सदस्यांना देण्यात यावा अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. दिशा समितीमार्फत केंद्र सरकारच्या 33 पेक्षा अधिक योजना राबविल्या जातात. या योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. Government schemes या योजनेत दिव्यांग व्यक्ती व विधवा महिलांना प्राधान्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तुडतुडा-मावा रोगाने नुकसान भरपाई देण्याकरीता निधीसाठी कृषि विभागाने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा. धानोली ते बाम्हणी रस्त्याच्या कामासाठी 8 दिवसात ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची घरे नाहीत अशा अतिगरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 500 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करुन देवून त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे. Government schemes शासनाच्या नियमानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत देण्यात यावी. नवेगावबांध येथील बिडी पत्ता संकलन करणार्या लोकांच्या बँक खात्यात अजुनपर्यंत पैसे जमा झालेले नाही, याकडे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी स्वत: लक्ष्य देवून सदर प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा.
जिल्ह्यातील काही भागात बीएसएनएल टॉवरची कनेक्टीव्हीटी होत नाही, याबाबत बीएसएनएल विभागाने लक्ष्य देवून कनेक्टीव्हीटीचे काम करुन घ्यावे. Government schemes जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना संबंधित विभागाने मार्केटिंग उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे. चिरचाळबांध ते दहेगाव रस्त्याचे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून काम करता येईल यासाठी विशेष बैठक लावण्यात यावी. पांगोली नदीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. येडमागोंदी-कडीकसा रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे. Government schemes अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागाला दिल्या. यावेळी शासनाच्या विविध योजनांबाबत आढावा घेण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले. संचालन जिपचे माहिती शिक्षण संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांचेसह दिशा समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. Government schemes