बेळगाव,
Jain Muni Murder कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका जैन मुनींची हत्या झाल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. Jain Muni Murder मुनी कामकुमार नंदी महाराज बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या भक्तमंडळींनी गुरूवारी महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. Jain Muni Murder त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू असतानाच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने मुनींची हत्या करून, मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले असल्याचे सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात असलेल्या नंदीपर्वत आश्रमातील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या १५ वर्षांपासून राहात होते. या भागात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. Jain Muni Murder आचार्य कामकुमार नंदी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगारे यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, संशयिताकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुनींच्या मृतदेहाचा तपास सुरू आहे. Jain Muni Murder संशयित स्पष्ट माहिती देत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्या संदीग्ध वक्तव्यांमुळे पोलिसांचा तपास प्रभवित झाला आहे.
कटकाबावी गावाजवळ मुनींचा मृतदेह तुकडे करून फेकल्याचे त्याने आधी सांगितले आणि मग मृतदेह कापडात गुंडाळून नदीत प्रवाहीत करून दिल्याचे सांगितले. Jain Muni Murder या दोन्ही मुद्यांच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असला तरी नंदी पर्वत आश्रमात शोककळा आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले असून, आश्रमातून अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन मुनींची हत्या झाली आहे. Jain Muni Murder