नेदरलॅण्डचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांचा राजीनामा

    दिनांक :08-Jul-2023
Total Views |
- स्थलांतर धोरणाच्या वादात कोसळले आघाडी सरकार
 
हेग, 
स्थलांतर धोरणाबाबत सहमती न झाल्याने नेदरलॅण्डचे पंतप्रधान Mark Rutte मार्क रुट्टे यांनी आघाडी सरकारमधून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. स्थलांतर धोरणावरून आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद झाल्यानंतर डच सरकार पडले, असे ते म्हणाले. रुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली शुक‘वारी झालेल्या चर्चेत चार मित्रपक्ष सहमत होऊ शकले नाहीत. रुट्टे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार दीड वर्षापूर्वी स्थापन झाले होते. मात्र गेल्या काही काळापासून स्थलांतर धोरणावरून सरकारमध्ये सहभागी पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर येत होते.
 
 
Mark Rutte
 
मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर शुक्रवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना Mark Rutte रुट्टे यांनी सरकार पडल्याच्या बातमीला दुजोरा दिला. शनिवारी किंग विलेम-अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुट्टे म्हणाले की, नवीन निवडणुका होईपर्यंत सर्व मंत्री काळजीवाहू मंत्रिमंडळ म्हणून काम करत राहतील. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान रुट्टे यांची व्हीव्हीडी पार्टी गेल्या वर्षी निर्वासित शिबिरांवर झालेल्या वादानंतर आश्रय घेऊ इच्छिणार्‍यांचा प्रवाह मर्यादित करण्याचा प्रयत्न करीत होती. नेदरलँड्समध्ये आश्रय अर्ज गेल्या वर्षी एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढून 47,000 हून अधिक झाले. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने सांगितले होते की, 2023 मध्ये आश्रय घेऊ इच्छिणार्‍यांकडून सुमारे 70,000 अर्ज येऊ शकतात.
 
 
 
पंतप्रधान Mark Rutte रुट्टे यांच्या सरकारने या आठवड्यात नेदरलँड्समधील युद्ध निर्वासितांच्या नातेवाईकांची सं‘या दरमहा 200 लोकांपर्यंत मर्यादित ठेवण्याची तरतूद असलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षांनी याला कडाडून विरोध केला. हा निर्णय आपल्यासाठी खूप कठीण असल्याचे सांगत पंतप्रधान रुट्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले की, सर्व बाजूंनी तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने स्थलांतर धोरणावरील मतभेद दूर करणे अशक्य आहे. नेदरलँडमध्ये पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक‘म 56 वर्षीय रुट्टे यांच्या नावावर आहे. ते 2010 पासून या पदावर आहेत.