बाईपण भारी देवा...!

शेतात फवारणीसाठी तिचा पुढाकार

    दिनांक :11-Aug-2023
Total Views |
मानोरा, 
हरिष खडकीकर
Baipan Bhari Deva देशात आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावुन प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे. चूल आणि मूल सांभाळणे ही संकल्पना मागे पडत असून प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहे. शेती व शेतमजुरी, वा नोकरी करणार्‍या महिला घर सांभाळुन आपले कार्य करत असतात याचे अनेक उदाहरणे आपणाला माहीत आहेत. आताच्या आधुनिक युगात मात्र महिला त्याही पुढे गेल्या आहेत. याचे उदाहरण तालुक्यातील इंझोरी येथे पाहायला मिळत आहे. येथील प्रगतशील शेतकरी अजय ढोक यांच्या पत्नी पूजा ढोक या स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरींग हाती घेऊन नांगरणी, वखरणीसह फवारणीचे काम करून शेतीतही पतीच्या खांद्याला खांदा लावून राबत आहेत.
 
 
Baipan Bhari Deva
 
अजय ढोक हे इंझोरी येथील प्रगतशील युवा शेतकरी आहेत. शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन मिळविण्याबाबत ते ओळखले जातात. शिवाय एका स्वयंसेवी संघटनेत ते जीवरक्षक म्हणूनही कार्य करतात. अशावेळी त्यांच्या पत्नी पूजा ढोक यासुद्धा त्यांना शेतीकामात मदत करतात. शेतीमधील प्रत्येक कामचे घडे त्यांनी माहेरीच घेतलेआहे. Baipan Bhari Deva शेतीमध्ये यंत्रचलित पेरणीसोबतच नांगरणी, वखरणी, डवरणी आणि फवारणी करता यावी, म्हणून त्यांनी ट्रॅक्टर चालवणेही शिकून घेतले आहे. आता कोणाच्याही मदतीविना त्या शेतात नांगरणी, डवरणी आणि फवारणीचे काम करीत आहेत. याचा मोठा हातभार त्यांचे पती अजय ढोक यांना मिळत असल्यामुळे पूजा ढोक यांचे कार्य इतर शेतकरी महिलांसाठी आदर्शच ठरत असून ईंझोरी परीसरात त्याच्या घाडसी वृत्तीचे कौतुक होत आहे. पुजा ढोक यांना शेतातील अवघड कामे करण्याचा जणू छंदच आहे. बियाण्यांवर बीज प्रक्रिया करणे, मळणीयंत्राने काढणी करणे ही कामे त्या पतीसोबत करतात. जेथे फवारणीतून अनेकांना विषबाधा होण्याची प्रकरणे घडतात. त्यामुळे अनेक जण या कामाकडे पाठ करीत असताना पुजा ढोक या मात्र हे काम अतिशय सुरक्षीतरित्या आणि सहज करीत आहेत.