’मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत शपथग्रहण

    दिनांक :11-Aug-2023
Total Views |
आरमोरी,
Meri Mati,Mera Desh स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ या प्रधानमंत्री निर्मित अभियाना अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम घेऊन 9 ते 15 ऑगस्ट या सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमस्थळी संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, सदस्य मयूर वनमाळी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, रासेयो विभाग प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. सीमा नागदेवे, आयक्युएसी प्रमुख डॉ. सतीश कोला उपस्थित होते.
 
mere mitti mera desh 
 
 याप्रसंगी संस्थेच्या वत्सलाबाई स्कूल ऑफ स्कालर्स परिसरात महाविद्यालचा माजी विद्यार्थी शहीद किशोर बोबाटे यांच्या स्मरणार्थ शिलाफलकाचे उद्घाटन संस्था सचिव मनोज वनमाळी यांचे हस्ते करण्यात आले. वीरांना नमन म्हणून महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकडून देशरक्षण करण्याची, देशगौरव वाढविण्याची आणि देशध्वजाचा सन्मान करण्याची शपथ घेण्यात आली.Meri Mati,Mera Desh संचालन डॉ. सीमा नागदेवे यांनी तर आभार प्रा. सतेंद्र सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शासनाच्या उपक्रमाचे पालन केले जाईल : वनमाळी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केलेले ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान निश्‍चितच प्रेरणादायी आहे. स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासनाद्वारे दिलेल्या कार्यक्रमाचे आमच्या संस्थेत पालन केले जाईल, असे प्रतिपादन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी यांनी केले.