डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार

16 Aug 2023 18:28:30
तभा वृत्तसेवा
साकोली, 
Rashtrasant Tukdoji Maharaj झाडीबोली चळवळीचे अर्ध्वर्यू व संशोधन महर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांना यंदाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार जाहीर झाला आहे.विद्यापीठाच्या पाच शाखेपैकी कला शाखेतून या पुरस्कारासाठी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची निवड झाली. अन्य चार शाखा वगळता त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पदवीधर कला शाखेतून निघाले आहेत. त्या लक्षावधी बुद्धीवंतामधून डॉ. बोरकरांची निवड व्हावी ही झाडीबोली चळवळीच्या दृष्टीकोनातून अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
 
 
Rashtrasant Tukdoji Maharaj
 
डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांचे शतकोत्तर साहित्य प्रकाशित असून त्यांनी रोवलेल्या झाडीबोलीच्या रोपटयाचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. वयाची अंशी गाठलेल्या या संशोधन महर्षीने आतापर्यंत अनेक मानाचे सन्मान प्राप्त केले असून तळागाळातल्या अनेक साहित्यिकांना पुढे आणून त्यांना झाडीबोली साहित्य संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. Rashtrasant Tukdoji Maharaj या पुरस्कारासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. बोरकर यांनी हा पुरस्कार झाडीबोली चळवळीतील सर्व सदस्य आणि गुरूदेव सेवा मंडळाशी जुळलेले सर्व बंधूजण यांना समर्पित केला आहे.

नागपूर विद्यापीठाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार आपल्याला जाहीर होणे हा अतिशय आनंददायी अमृत क्षण आहे. राष्ट्रसंतांनी आमच्या गावात जी अर्ध्या तासाची भेट दिली, Rashtrasant Tukdoji Maharaj त्याने संपुर्ण गाव बदलून गेले. मी देखील त्यातलाच एक आहे. झाडीबोली साहित्य चळवळीचे अधिष्ठान देखील राष्ट्रसंतच्या शिकवणीवर आधारित आहे. त्यामुळेच प्रत्येक झाडीबोली साहित्य संमेलनाच्या विचारपिठासमोर राष्ट्रसंतांची प्रतिमा अग्रक्रमाने ठेवलेली असते. या पुरस्कारामुळे झाडीबोली चळवळीतील सर्व सदस्यांना हत्तीचे बळ प्राप्त होईल यात कोणतीही शंका नाही.
- डॉ. हरिश्चंद्र बोरकर
Powered By Sangraha 9.0